Tax on Auto Industry: भारतातील आघाडीची आटोमोबाईल कंपनी Bajaj Auto चे एमडी राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी देशातील वाहन उद्योगावर लादण्यात आलेल्या उच्च कर प्रणालीचा(Tax System) विरोध केला आहे. एकीकडे देशात उत्सर्जन मानक वाढवले जात आहेत, तर दुसरीकडे वाहन उद्योगावर 28 टक्के कर लादण्यात आला आहे. आसियान देशांमध्ये वाहन उद्योगावरील कर 8 ते 14 टक्के आहे. वाहन उद्योगाला भारतात सर्वाधिक कर भरावा लागतो, असे त्यांनी म्हटले. तसेच, वाहनांवरील कर 28 टक्क्यांवरून 12 किंवा 18 टक्क्यांवर आणण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
राजीव बजाज म्हणाले की, मोटारसायकल ही लोकांची रोजची गरज आहे. सरकारने उत्सर्जन मानके वाढवल्याने आम्हाला अडचण नाही, पण मोटारसायकलवरील कर कमी केला पाहिजे. बाईकवरील कर 12 किंवा 18 टक्के झाला तर वाहन उद्योगासाठी ते खूप सोयीचे होईल. यावेळी त्यांनी बाईक्सच्या वाढत्या किमतीसाठी अवाजवी नियम आणि उच्च कर प्रणालीला जबाबदार धरले.
बजाज Pulsar NS400Z लॉन्च
राजीव बजाज कंपनीच्या नवीन Pulsar 400 बाईकच्या लॉन्च इव्हेंटला उपस्थित होते. पल्सर या नव्या बाइकची किंमत 1.85 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Pulsar NS400Z थेट Dominar 400, KTM 390 Duke आणि Triumph Speed 400 शी स्पर्धा करेल. बजाज ऑटोने आतापर्यंत सुमारे 1.8 कोटी पल्सरची विक्री केली आहे. 2001 साली लॉन्च झालेल्या या बाईकने आतापर्यंत कंपनीला 10 हजार कोटी रुपयांची कमाई करुन दिली आहे.
कंपनीला मार्च तिमाहीत मोठा फायदा
बजाज ऑटोने मार्च तिमाहीत 1,936 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर सुमारे 35 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 23 च्या याच तिमाहीत कंपनीला 1,433 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल 29 टक्क्यांनी वाढून 11,485 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 23 च्या याच तिमाहीत हा आकडा 8,905 कोटी रुपये होता.
अॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!