Join us

रिलायन्स समूहाचे योगदान; सरकारी तिजोरीत जमा केले 5.50 लाख कोटी रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 7:48 PM

आज रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, ज्यात मुकेश अंबानी यांची अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Reliance AGM 2024 : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीला इथपर्यंत आणण्याचे संपूर्ण श्रेय मुकेश अंबानी यांना जाते. विशेष म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीज देशाच्या सरकारी तिजोरीसाठीही फार महत्त्वाची कंपनी आहे. कंपनी दरवर्षी लाखो कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करते. 

गेल्या 3 वर्षांत रिलायन्स समूहाने सरकारी तिजोरीत तब्बल 5.5 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. देशातील कोणत्याही कॉर्पोरेटने सरकारी तिजोरीत केलेले हे सर्वात मोठे योगदान आहे. फक्त 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने सरकारी तिजोरीत 1,86,440 कोटी रुपये जमा केले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुकेश अंबानी सरकारी तिजोरीत एवढे पैसे का जमा करते? तर, हे पैसे टॅक्सच्या रुपात सरकारी तिजोरीत जमा होत आहेत.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या 7 मुद्द्यांद्वारे जाणून घ्या...

  • रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकत्रित महसूल 2023-24 या आर्थिक वर्षात 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. असे करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे.
  • 2023-24 या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 79,020 कोटी रुपये आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात 2.99 लाख कोटी रुपयांची निर्यात केली आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या हे प्रमाण 8.2 टक्के आहे.
  • गेल्या 3 वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने 5.28 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वाधिक कर भरणारी एकमेव कंपनी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने कर म्हणून 1.86 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. गेल्या 3 वर्षात 5.50 लाख कोटी रुपयांचा कर भरला आहे.
  • 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) वर वार्षिक खर्च 25 टक्क्यांनी वाढून 1,592 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या 3 वर्षात यावर 4,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी 1.7 लाख नवीन रोजगार निर्माण केला. समूहातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6.5 लाखांवर पोहोचली आहे.
टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसाय