Lokmat Money >आयकर > टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...

टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...

कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:58 PM2024-08-07T18:58:54+5:302024-08-07T18:59:23+5:30

कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Reliance tops in tax payment, Mukesh Ambani's company paid ₹1.86 lakh crore tax | टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...

टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...

Mukesh Ambani : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारला एकूण 1,86,440 कोटी रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 9 हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

RIL सर्वादिक मार्केट कॅपवाली कंपनी
शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप सर्वाधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 20 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडणारी रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. या आकड्याला आतापर्यंत अन्य कोणतीही कंपनी स्पर्श करू शकलेली नाही. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या बाबतीत रिलायन्स ही जगातील 48वी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सने 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. 

मागील आर्थिक वर्षात कंपनीने सूमारे 3 लाख कोटींची निर्यात केली होती. गुंतवणुकीच्या बाबतीतही रिलायन्स अव्वल आहे. वार्षिक अहवालानुसार, रिलायन्सने 2023-24 या आर्थिक वर्षात 1 लाख 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली.

मुकेश अंबानी काय म्हणाले?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वार्षिक अहवालात म्हटले की, मागील दशकात भारताचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या या जगात भारत स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून चमकत आहे. सर्व क्षेत्रातील मजबूत वाढ, हे 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. भारत आणि भारतीयत्वाची ही भावनाच रिलायन्सला सतत नवनवीन शोध घेण्यास आणि प्रत्येक प्रयत्नात उत्कृष्टता प्राप्त करण्यास प्रवृत्त करते. 

 

Web Title: Reliance tops in tax payment, Mukesh Ambani's company paid ₹1.86 lakh crore tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.