गेल्या वर्षी आलेली नवीन कर प्रणाली फारशी फायद्याची नसल्याने जुनी कर प्रणाली कोणी सोडण्यास तयार नव्हते. कर वाचविण्यासाठी आतापर्यंत बहुतांश जणांनी म्युच्युअल फंड, एनपीएस, इन्शुरन्स असे गुंतवणुकीचे मार्ग शोधले होते. त्यातूनच ते पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करत होते. परंतू आता केंद्र सरकारने ७ लाखांवर असलेले करमुक्तीचे जाळे थेट १२ लाखांवर नेऊन ठेवले आहे. यामुळे याचा लाभ घेण्यासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९७ टक्के करदाते जुन्यावरून नव्या कर प्रणालीकडे (New Tax Regime) वळण्याची शक्यता आहे.
१२ लाखांचे उत्पन्न करमुक्त मोठे आहेच, पण मोठा धमाका अजून बाकी आहे; तज्ञांकडून मोठे भाकीत
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवि अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. देशात ८-८.५ कोटी वैयक्तिक करदाते आहेत आणि त्यापैकी सुमारे ७५ टक्के लोकांनी आधीच नवीन कर प्रणाली स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कर स्लॅबमध्ये बदल केला आहे आणि १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे, त्यामुळे आता ९० टक्के ते ९७ टक्के करदाते या नवीन कर प्रणालीकडे वळू शकतात असे अग्रवाल यांचा म्हणणे आहे. इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला त्यांनी ही माहिती दिली आहे.
नवीन कर प्रणालीनुसार कर भरणा करणे देखील आता सोपे झाले आहे. आता करदातेच हे वापरू शकत आहेत. एकदा का विकास झाला की लोक वापर वाढवतात आणि खर्चही वाढतो. यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागतो, असे त्यांनी सांगितले.
१२.७५ लाखांचे उत्पन्न करमुक्त...अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा १२.७५ लाखांपर्यंत होणार आहे. ७५ हजार स्टँडर्ड डिडक्शन आहे.