Join us

Dream 11 आणि My11Circle वर पैसे लावताय? मग 'हे' नियम माहिती असायलाच हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:24 IST

IPL 2025 : आयपीएल हंगामादरम्यान अनेकजण Dream 11 आणि My11Circle सारख्या गेममध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. तुम्ही देखील हा खेळ खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

IPL 2025 : सध्या आयपीएलचा हंगाम जोरात सुरू आहे. सायंकाळी साडेसात वाजले की प्रत्येकजण मोबाईल किंवा टिव्हीसमोर बसलेला दिसतो. तर काहीजण Dream 11 आणि My11Circle वर खेळून नशिब आजमावतानाही पाहायला मिळतात. तुम्ही देखील असे ऑनलाईन गेम खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ड्रीम इलेव्हन आणि माय इलेव्हन सर्कल हे एक फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. इथे युजर्स विविध खेळांसाठी स्वतःचे आभासी संघ तयार करू शकतात. यात संघाने चांगली कामगिरी केली तर रोख बक्षिसे मिळतात.

सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही Dream 11 आणि My11Circle मधून १०,००० रुपयांपेक्षा जास्त कमावले तर तुम्हाला आयकर नियमांनुसार TDS किंवा कर भरावा लागेल. यासह, तुम्हाला जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) अंतर्गत नोंदणी करावी लागेल. तुम्ही असे न केल्यास, आयकर विभाग तुम्हाला समन्स आणि नोटीसही पाठवू शकतो. ते तुमच्या कमाईची चौकशी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या खेळातून कसे पैसे मिळतात?लीगमध्ये भाग घेणे : वापरकर्ते प्रवेश शुल्क भरून स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. खेळात जिंकल्यास रोख बक्षीसे मिळतात.रेफरल प्रोग्राम : नवीन वापरकर्त्यांना रेफर करून बोनस आणि रोख बक्षिसे मिळू शकतात.विशेष स्पर्धा : मोठ्या स्पर्धांमध्ये बक्षीसाजची रक्कम जास्त असते, ज्यामुळे अधिक कमाईची शक्यता वाढते.

कसा आहे खेळ?ड्रीम इलेव्हन किंवा माय इलेव्हन सर्कल वर तुम्हाला ११ खेळाडूंचा एक आभासी संघ तयार करावा लागतो. यातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार गुण मिळवतात. जो वापरकर्ता सर्वाधिक गुण मिळवतो तो बक्षीस जिंकतो. या बक्षिसांची रक्कम लाखांपासून कोटींपर्यंत असू शकते.

आयकर नियमांतर्गत कर संकलनड्रीम इलेव्हन किंवा इतर काल्पनिक क्रीडा प्लॅटफॉर्मवरील कमाई करपात्र उत्पन्न मानली जाते. भारतात, प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत, ही कमाई "इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न" अंतर्गत येते आणि त्यावर कर आकारला जातो.३०% TDS (स्रोतवर कर वजा) : जर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली तर आपोआप ३०% TDS कापला जातो. म्हणजे तुमच्या बक्षीसातून ३० टक्के रक्कम कापून पैसे दिले जातात.ITR मध्ये अहवाल देणे : वापरकर्त्यांनी त्यांच्या वार्षिक आयकर रिटर्नमध्ये (ITR) या उत्पन्नाचा अहवाल देणे आवश्यक आहे.GST नियम : जर वापरकर्ता या प्लॅटफॉर्मवरून नियमितपणे कमाई करत असेल, तर त्याला GST साठी नोंदणी करणे आवश्यक असू शकते.

कर न भरल्यास दंड आणि शिक्षाजर एखाद्या व्यक्तीने ड्रीम इलेव्हनच्या कमाईवर कर भरण्याचे टाळले तर आयकर विभाग कठोर कारवाई करू शकतो.दंड : जर कर भरला नाही तर, सरकार दरमहा १% व्याज आणि थकीत रकमेवर ५०% पर्यंत अतिरिक्त दंड आकारू शकते.सूचना आणि तपास : करचुकवेगिरीच्या बाबतीत कर विभाग समन्स आणि नोटीस पाठवू शकतो.तुरुंगवासाची शिक्षा : जाणूनबुजून कर चोरी केल्यास ३ ते ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

वाचा - अमेरिकेच्या मनमानीविरोधात भारत-चीन एकत्र? डोनाल्ड ट्रम्प यांना देणार प्रत्त्युत्तर  

जोखीम आणि खबरदारीहा खेळ कौशल्यावर आधारित असला तरी तो कमाईचे पूर्णपणे हमखास साधन नाही. अनेकांना यात पैसे गमवावे लागतात. याची तुम्हाला सवयही लागू शकते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादा