Join us

Nil ITR म्हणजे काय; कोणी आणि का भरावा? जाणून घ्या याचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 3:57 PM

What is Nil ITR : तुमचे उत्पन्न करपात्र नसेल, तरीदेखील NIL ITR भरणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

What is Nil ITR : आयटीआर(ITR) भरण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. 31 जुलै 2023 पर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता, पण शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहणे धोक्याचे ठरू शकते. अनेकदा साईटवर अडचणी  येऊ शकतात. त्यामुळे जितक्या लवकर ITR फाईल होईल तितके चांगले. आज आम्ही Nil ITR किंवा Zero ITR बद्दल माहिती देणार आहोत. काय आहे झिरो आयटीआर, कोण भरू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत? 

तुमचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष 2022-23 मधील सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला आयटीआर भरणे अनिवार्य नाही. सूट मर्यादा तुम्ही कोणती आयकर व्यवस्था निवडता, त्यावर अवलंबून आहे. जर एखाद्याने जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल, तर सूट मर्यादा व्यक्तीच्या वयावर अवलंबून असेल. जर एखाद्याने नवीन कर प्रणालीची निवड केली असेल, तर सूट मर्यादा 3 लाख रुपये आहे. तुमचे उत्पन्न सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास आयटीआर फाइल करणे आवश्यक नाही, परंतु तरीही तुम्ही आयटीआर फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. 

Nil ITR म्हणजे काय?NIL ITR हा एक प्रकारचा ITR आहे, ज्यामध्ये करदात्यावर कोणतेही कर दायित्व नसते. म्हणजे तुमच्यावर कोणताही कर लावला जात नाही. अशा स्थितीतत NIL ITR भरला जातो. सोप्या भाषेत सांगाचये झाल्यास तुमचे एकूण उत्पन्न मूळ उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल, तर तुम्ही निल आयटीआर भरू शकता. यात तुमच्याकडून एक रुपयाही आकारला जात नाही. 

NIL ITR का भरावा?नांगिया अँडरसन इंडियाचे भागीदार नीरज अग्रवाल सांगतात की, “तुमचे उत्पन्न करपात्र नसेल, तरीदेखील कर भरणे शहाणपणाचे आहे. यामुळे त्या आर्थिक वर्षातील तुमचे उत्पन्न रेकॉर्डवर येते. यामुळे तुम्हाला गृहकर्ज किंवा इतर प्रकारचे कर्ज घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. कारण, बँकेत गेल्यावर तुमच्याकडून ITR मागतिला जातो. अशावेळी तुम्ही NIL ITR दाखवू शकता.

शिष्यवृत्ती मिळणे सोपे होतेकाही शिष्यवृत्तीमध्ये अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचा आयकर रिटर्न पुरावा सादर करणे आवश्यक असू शकते. उदाहरणार्थ, काही विशेष सरकारी शिष्यवृत्ती आहेत, त्यानुसार संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असावे लागते. अशावेळी तुम्ही तिथे हा NIL ITR दाखवू शकता.

व्हिसा मिळण्यात अडचणी येत नाहीतपरदेशी प्रवासासाठी, व्हिसा अधिकाऱ्यांना साधारणपणे गेल्या काही वर्षांतील आयटीआर आवश्यक असतात. कारण, ज्या परदेशात प्रवास करायचा आहे, त्यांना व्हिसा देण्यापूर्वी व्यक्तीच्या उत्पन्नाची माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे व्हिसा अर्जाच्या वेळी आयटीआर, बँक स्टेटमेंट आणि इतर आर्थिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अशावेळी तुमचे NIL ITR कामी येते.

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसायगुंतवणूकआयकर मर्यादा