Join us

Income Tax रिटर्न फाईल करणं का आहे आवश्यक? हे आहेत १० महत्त्वाचे फायदे, बदलेल तुमचा विचार

By जयदीप दाभोळकर | Updated: March 19, 2025 16:47 IST

Income Tax Return: आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अशा १० फायद्यांविषयी सांगणार आहोत, ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही आयटीआर नक्कीच दाखल कराल.

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरणं का आवश्यक आहे, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल? आर्थिक सल्लागार अनेकदा कर दायित्वाखाली नसलेल्यांनाही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सल्ला देतात. आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अशा १० फायद्यांविषयी सांगणार आहोत, ही माहिती जाणून घेतल्यानंतरही तुम्ही आयटीआर नक्कीच दाखल कराल.

१. कायदेशीर दायित्वसरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबची घोषणा केली जाते. त्यामुळे आयकर विभागांतर्गत करपात्र श्रेणीत मोडणाऱ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे. अशा लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल न केल्यास त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई होऊ शकते.

२.टॅक्स रिटर्नआर्थिक वर्षात अनेकदा अधिक कर कापला जातो. उदाहरणार्थ, नियोक्ता पगार जमा करताना टीडीएस कापतो. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार टॅक्स लायबिलिटीपेक्षा जास्त टॅक्स भरला असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड मिळू शकतो.

३.वित्तीय रेकॉर्ड ठेवण्याची सुलभताहे आपल्या आर्थिक नोंदी ठेवण्यास मदत करू शकते. यासोबतच भविष्यात आयटीआरची चौकशी झाली तर ती तुमचं संरक्षणही करू शकते.

४. व्हिसा प्रोसेसिंगची सुलभताजर तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न उपयुक्त ठरू शकते. अनेक देश गेल्या दोन ते तीन वर्षांच्या आयटीआर रिटर्नची कागदपत्रे मागतात. त्याआधारे आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली जाते.

५. बँक कर्जासाठी आवश्यकभविष्यात कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआरही मागितला जाऊ शकतो. यामाध्यमातून अर्जदाराची आर्थिक स्थिती कशी आहे, हे वित्तीय संस्था पाहतात. ती व्यक्ती कर भरते की नाही याचीही माहिती घेतली जाते. कर्ज घेण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा आयटीआर मागितला जाऊ शकतो.

६. मजबूत क्रेडिट स्कोअरसाठी आवश्यकवेळेवर आयटीआर भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत करू शकता. यावरून आपण एक जबाबदार करदाते आहात हे दिसून येतं.

७. गुंतवणुकीसाठी तसंच विम्यासाठी ते आवश्यक ठरू शकतेअनेकदा मोठी इन्शुरन्स पॉलिसी घेतानाही इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती मागवली जाऊ शकते. याशिवाय म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदींमध्ये गुंतवणुकीसाठीही आयटीआरची आवश्यकता भासू शकते.

८. वाढते नुकसानआपल्या व्यवसायात भांडवली नफा असल्यास आयटीआर देखील दाखल केला जाऊ शकतो. यामुळे तोटा आणखी समायोजित करता येतो.

९. सरकारी लाभासाठीसरकारी योजना आणि सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा इन्कम टॅक्स रिटर्नचीही गरज भासू शकते.

१०. व्यवसाय करार सुरक्षित करण्यासाठी आवश्यककाही वेळा मोठे बिझनेस डील्स, बिझनेस लोन, टेंडरसाठीही आयटीआरची गरज भासू शकते.

टॅग्स :इन्कम टॅक्स