Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:16 AM2020-05-12T08:16:30+5:302020-05-12T08:17:03+5:30

पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 

Increasing lockdown would be suicide for the economy: Anand Mahindra vrd | Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

मुंबई- कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, त्याला थोपवण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, १७ मेनंतर पुढे लॉकडाऊन वाढणार का?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा लॉकडाऊनवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊन दीर्घ कालावधीसाठी वाढविण्यात आला तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून, अर्थव्यवस्थेसाठी ते आत्मघातकी पाऊल ठरेल, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष म्हणाले की, लॉकडाऊनने लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

 ते म्हणाले की, जपानमधील युद्धात पराभूत झालेल्या योद्ध्यांनी युद्धबंदी होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याच्या पर्याय निवडला होता, त्या प्रथेला हारकिरी असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याचं वाटत असतानाच नवीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. आपली लोकसंख्या आणि उर्वरित जगातील कोरोना संक्रमणाची कमी प्रकरणं पाहिल्यास आपल्याकडे तपासण्या वाढल्या असल्या तरी संसर्ग होण्याच्या नवीन घटनांत वाढ होणे अपरिहार्य आहे. आम्ही आलेख तात्काळ खाली येईल, अशी आम्ही अपेक्षा करू शकत नाही.

पण याचा अर्थ लॉकडाऊनने काहीही मदत झाली नाही, असा नाही. महिंद्रा म्हणाले की, भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज असून, रुग्णालयातील ऑक्सिजन, पीपीई कीट सारखं सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसेच सामाजिक अंतराचं पालन करणंही आवश्यक आहे, असंसुद्धा आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.  

Web Title: Increasing lockdown would be suicide for the economy: Anand Mahindra vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.