Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी

भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी

जगभर झालेल्या एकूण विक्रीपैकी एकतृतीयांश कार एकट्या चीनमध्ये विकल्या गेल्या आहेत. २०२४ च्या नऊ महिन्यांत चीनमध्ये २.१४ कोटी कारची विक्री झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 10:29 AM2024-11-20T10:29:02+5:302024-11-20T10:30:12+5:30

जगभर झालेल्या एकूण विक्रीपैकी एकतृतीयांश कार एकट्या चीनमध्ये विकल्या गेल्या आहेत. २०२४ च्या नऊ महिन्यांत चीनमध्ये २.१४ कोटी कारची विक्री झाली.

India overtakes America in trade; 6.5 crore four-wheelers sold worldwide in nine months | भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी

भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी

नवी दिल्ली : भारतच नव्हे, तर जगभरात वाहनांची विक्री जोरदार सुरू आहे. या वर्षात जानेवारीपासून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत तब्बल ६.५ कोटी कारची विक्री करण्यात आली आहे. सर्वाधिक कारविक्रीमध्ये अव्वल ठरला आहे. याबाबतीत जपान दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले आहे. 

वार्षिक आधारे विचार केला असता ही वाढ केवळ ०.३ टक्का इतकी आहे. मागच्या वर्षी याच समान कालावधीत ६ कोटींपेक्षा अधिक कारची विक्री झाली होती. 

जगभर झालेल्या एकूण विक्रीपैकी एकतृतीयांश कार एकट्या चीनमध्ये विकल्या गेल्या आहेत. २०२४ च्या नऊ महिन्यांत चीनमध्ये २.१४ कोटी कारची विक्री झाली. वार्षिक आधारे यात ३.७ टक्के वाढ झाली आहे. भारतातील कारविक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत ३.६ टक्के वाढ झाली तर जपान, अमेरिका आणि जर्मनीच ही विक्री घटल्याचे दिसून आले आहे. 

कोणत्या कंपन्यांची विक्री सर्वाधिक? (कोटींमध्ये)
टोयोटा - २७.४
वोल्क्सवॅगन - २१.८  
ह्यूंदाई - १७.८
जनरल मोटर्स, बीवायडी, फोर्ड, होंडा, गिली व निसान या कंपन्यांची मोठी विक्री. 

Web Title: India overtakes America in trade; 6.5 crore four-wheelers sold worldwide in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.