Lokmat Money > बिझनेस न्यूज > IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo News : तुम्ही जर विमानानं प्रवास करत असाल तर कधी ना कधी तुम्ही इंडिगोनं गेलाच असाल. देशात बजेट एअरलाईन्समध्ये याचा समावेश होतो. पण आता इंडिगोसाठी चांगली बातमी नाहीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:00 PM2024-12-04T13:00:05+5:302024-12-04T13:00:05+5:30

IndiGo News : तुम्ही जर विमानानं प्रवास करत असाल तर कधी ना कधी तुम्ही इंडिगोनं गेलाच असाल. देशात बजेट एअरलाईन्समध्ये याचा समावेश होतो. पण आता इंडिगोसाठी चांगली बातमी नाहीये.

IndiGo included in list of worst airlines know which is the best airline details rangings top 10 and worst 10 | IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo News : तुम्ही जर विमानानं प्रवास करत असाल तर कधी ना कधी तुम्ही इंडिगोनं गेलाच असाल. देशात बजेट एअरलाईन्समध्ये याचा समावेश होतो. पण आता इंडिगोसाठी चांगली बातमी नाहीये. जगातील सर्वात खराब विमान कंपन्यांच्या यादीत भारतातील इंडिगोचा समावेश झालाय. एअरहेल्प इंकनं सर्वोत्तम आणि खराब कामगिरी करणाऱ्या एअरलाइन्सचं वार्षिक विश्लेषण जाहीर केलंय. एअरहेल्प स्कोअरचा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. हा अहवाल जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारीवर आधारित आहे.

रँकिंग कशाच्या आधारे?

बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार एअरलाइन रँकिंग सिस्टम जगभरातील ग्राहकांच्या दाव्यांवर तसंच प्रत्येक उड्डाणासाठी वेळेवर आगमन आणि प्रस्थान ट्रॅक करणारा एक्स्टर्नल डेटा तसंच ५४ पेक्षा जास्त देशांमधील प्रवाशांकडून त्यांच्या अलीकडील उड्डाणातील जेवणाच्या गुणवत्तेबद्दल, आराम आणि क्रू सेवेबद्दल अभिप्राय यावर काम करते.

"हे विश्लेषण विमान कंपन्यांना प्रवाशांचे प्रतिक्रिया सातत्यानं ऐकण्यास प्रोत्साहित करेल या आशेने एअरहेल्पच्या कामगिरीचा स्नॅपशॉट देण्याचं उद्दीष्ट आहे," अशी प्रतिक्रिया एअरहेल्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉमस पावलिसिन यांनी दिली.

सर्वात वाईट विमान कंपनी कोणती?

जगातील सर्वात खराब कामगिरी करणारी विमान कंपनी ट्यूनिस एअर १०९ व्या स्थानावर आहे. बॉटम १० मध्ये काही राष्ट्रीय आणि कमी किमतीच्या विमान कंपन्याही आहेत. यामध्ये रायनएअर होल्डिंग्स पीएलसी, बल्गेरिया एअर, तुर्की एअरलाइन, पेगासस एअरलाइन्स आणि एअर मॉरिशसची उपकंपनी बझ या पोलिश एअरलाइन्सचा समावेश आहे. परंतु, खालच्या ५० मध्ये उत्तर अमेरिकन विमान कंपन्या जेटब्लू आणि एअर कॅनडा देखील आहेत.

ट्युनिस एअरनं सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या एअरलाइन्स म्हणून कायम राहिली आहे, त्याखालोखाल रायनएअर आणि आयएजी एसएची उपकंपनी एर लिंगस आहे, जी ब्रिटिश एअरवेज आणि आयबेरियाच्या मालकीची आहे.

सर्वोत्कृष्ट विमानसेवा कोणती?

जागतिक लेबलवरील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विमान सेवा म्हणजे ब्रुसेल्स एअरलाइन्स. हा डॉयचे लुफ्थान्सा एजीचाच भाग आहे, ज्यानं कतार एअरवेजला मागे टाकलंय. गेल्या वर्षी १२ व्या स्थानावर असलेल्या बेल्जियमच्या राष्ट्रीय विमान कंपनीसाठी ही लक्षणीय सुधारणा आहे.

युनायटेड एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स या दोन्ही कंपन्या टॉप-५ मध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कॅनडाची एअर ट्रान्सॅट ३६ व्या स्थानावर आहे. डेल्टा एअर लाइन्स २०२३ मध्ये नंबर ११ व्या क्रमांकावर होती ती आता १७ व्या क्रमांकावर घसरली. हवाईयन होल्डिंग्स इंक अलास्का एअरलाइन्सच्या विलीनीकरणामुळे अलास्का एअरलाइन्स देखील यावर्षी ३० स्थानावरून ८८ व्या क्रमांकावर घसरली आहे.

जगातील सर्वात वाईट एअरलाइन्स

१०० स्काय एक्सप्रेस
१०१ एअर मॉरिशस
१०२ तारोम
१०३ इंडिगो
१०४ पेगासस एअरलाइन्स
१०५ एल अल इस्रायल एअरलाइन्स
१०६ बल्गेरिया एअर
१०७ नोवेलेयर
१०८ बज
१०९ ट्युनिसायर

जगातील सर्वोत्कृष्ट १० विमान कंपन्या

  • ब्रसेल्स एअरलाइन्स
  • कतार एअरवेज
  • युनायटेड एअरलाइन्स
  • अमेरिकन एअरलाइन्स
  • प्ले (आइसलँड)
  • ऑस्ट्रियन एअरलाइन्स
  • एलओटी पोलिश एअरलाइन्स
  • एअर अरेबिया
  • वाइडरो
  • एअर सर्बिया

Web Title: IndiGo included in list of worst airlines know which is the best airline details rangings top 10 and worst 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.