Insurance Premium : तुम्ही जर आरोग्य किंवा जीवन विमा घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींसाठी प्रीमियम पेमेंट सुलभ करण्यासाठी एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. आता तुम्हाला विम्यासाठी प्रीमियम भरण्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही. Bima-ASBA असं या नवीन प्रणालीचे नाव आहे.
IRDAI ने म्हटले आहे की नवीन प्रणाली पॉलिसीधारकांना प्रीमियम पेमेंटसाठी त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी ब्लॉक करण्याची परवानगी देते. नवीन प्रणालीमुळे सुविधा वाढणार असून पेमेंट वेळेवर करण्यात मदत होणार आहे. ही नवी प्रणाली १ मार्चपासून लागू होणार आहे.
विमा ASBA म्हणजे काय?विमा ASBA च्या नवीन प्रणालीमध्ये तुमच्या बँक खात्यातील विम्याची ठराविक रक्कम पॉलिक कंपनीला ब्लॉक करण्याची परवानगी देते. ही सर्व प्रक्रिया यूपीआयद्वारे केली जाणार आहे. तुमचे पैसे जरी ब्लॉक झाले तरी तुमच्या मंजुरीशिवाय विमा कंपनीला पैसे काढता येत नाहीत. दर तुम्ही अर्ज नाकारला तर रक्कम आपोआप अनब्लॉक केली जाईल.
जर विमा कंपनीने पॉलिसी मंजूर केली नाही तर निधी पॉलिसीधारकाच्या खात्यातच राहतो. नवीन प्रणालीनुसार, पॉलिसी जारी केल्यानंतरच पैसे कापले जातात. जास्तीत जास्त १४ दिवस ही रक्कम ब्लॉक केली जाऊ शकते. तुम्ही विमा स्वीकारल्यानंतर हे पैसे कंपनीच्या बँक खात्या हंस्तातरित केले जातात.
ही सुविधा कोण वापरू शकते?विमा पॉलिसीसाठी अर्ज करताना जर तुम्ही विमा ASBA चा पर्याय निवडला तरच तुम्हाला ही सुविधा मिळेल. यासाठी फॉर्ममध्ये तुम्हाला प्रीमियमची रक्कम ब्लॉक करणे मंजूर करण्याचा पर्याय निवडावा लागेल. तुमच्या खात्यातील आवश्यक रक्कम ब्लॉक करण्यासाठी विमा कंपनी तुमच्या बँकेला विनंती पाठवेल. यानंतर, ग्राहकाच्या मंजुरीनंतरच खात्यातून रक्कम डेबिट केली जाते.