Join us

तुमच्या एका चुकीमुळे Car Insurance क्लेम रिजेक्ट होईल; या नियम आणि अटी माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:26 AM

Car Insurance : तुमच्या कारचा इन्शुरन्श तुम्ही नक्कीच उतरवला असेल. मात्र, गाडीचा क्लेम अनेक कारणांनी रद्द केलाज जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला काही नियम माहिती असणे आवश्यक आहे.

Car Insurance : तुम्ही कार खरेदी करता तेव्हा साहजिकच गाडीचा विमा उतरवला जातो. यासाठी तुम्ही प्रीमियम भरता. रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी वाहन विमा (Car Insurance) आवश्यक आहे. मोटार इन्शुरन्स तुमच्या वाहनाचे कुठल्याही प्रकारे नुकसान झाल्यास आर्थिक जोखमीपासून तुमचे रक्षण करते. कोणतीही अनुचित घटना घडल्यास विमा कंपनीकडे क्लेम केला जातो. पण अनेकवेळा काही कारणास्तव हा दावा फेटाळला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे वाहन विमा खरेदी करताना अटी आणि शर्थींकडे दुर्लक्ष करू नका.

ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणेवाहन चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर वैध वाहनचालक परवाना नसताना तुम्ही क्लेम केला तर असे दावे स्वीकारले जात नाहीत. वैध परवान्याशिवाय वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे तुमचा कार विमा दावा पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो. इतकचं नाही तर तुम्हाला किमान ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.

क्लेम करण्यास उशीर करणेअपघात किंला कोणत्याही नुकसानीबद्दल तुमच्या विमा कंपनीला सूचित करण्यासाठी ठराविक कालवधी असतो. दावा दाखल करताना कार विमा कंपनीला शक्य तितक्या लवकर कळवणे आवश्यक आहे. अपघाताचा रिपोर्ट देण्यास उशीर झाल्यास कार विमा दावा निकाली काढण्याची प्रक्रिया किचकट बनवू शकते. अनेकदा १००% दावा नाकारलाही जावू शकतो.

प्रीमियम चुकवू नकातुमच्या विम्याचा कुठलाही प्रीमियम चुकवू नका. अशा परिस्थितीत तुमची पॉलिसी संपुष्टात येते. तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विम्याचे हप्ते वेळेवर भरणे शहाणपणाचे आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची कार खराब झाल्यास, तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास दावा नाकारला जाऊ शकतो.

नशेत गाडी चालवणेदारूच्या नशेत वाहन चालवणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण, यामुळे फक्त विम्याचा दावाच नाकारला जात नाही तर तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. अल्कोहोल किंवा इतर कुठल्याही अंमली पदार्थांचे सेवन असो, ड्रायव्हिंग करताना त्यांच्या सेवनाची कोणतीही चिन्हे दिसल्यास तुमचा इन्शुरन्स पास होणार नाही. तुमचा दावा नाकारण्याव्यतिरिक्त, तुम्हाला अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतात.

कंपनीच्या परवानगीशिवाय दुरुस्ती करणेविमा कंपनीला न कळवता कारची कोणतीही दुरुस्ती तुमच्या मोटार विमा पॉलिसी अंतर्गत केली जाणार नाही. अपघात झाल्यास विमा कंपनीने दावा दावा स्वीकारण्याच्या आधीच गाडीची दुरुस्ती करू नये. कारण, कंपनीचा अधिकारी येऊन गाडीची तपासणी करतो. त्यानंतरच गाडीचा क्लेम पास होतो. 

टॅग्स :कारअपघात