एकीकडे विविध खासगी कंपन्यांकडून विमा योजनांचे दमदार मार्केटिंग सुरू असते; मात्र अशा स्थितीत टपाल विभागाच्याही विश्वासार्ह विमा योजनांकडे मोर्चा वळविल्यास अधिक लाभदायी ठरू शकतात. पोस्टाच्या विमा योजनेत विविध योजनांचा समावेश आहे. सर्व योजनांमध्येही एकाच वेळी गुंतवणुकीची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे आता नवे आर्थिक वर्ष सुरू होत असताना जमा-खर्चाचा मेळ घालून या पोस्टाच्या विमा योजनांचा मार्ग निवडण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
'प्रीमियम'चा दर कमी, बोनस मात्र जास्त
पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या विमा योजना, त्यांच्या जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे खरेच कमीतकमी प्रिमियममध्ये जास्तीत जास्त बोनस देणाऱ्या योजना आहेत. विम्याचा हप्ता अन्य योजनांपेक्षा कमी असून बोनसचे दर अधिक आहेत. जवळपास २० टक्क्यांहून अधिक. या योजनांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प असा २०,००० रुपयांच्या रकमेचासुद्धा विमा घेता येतो. खासगी विमा कंपन्या १ लाखांहून कमी रकमेचा विमा देत नाहीत.
ब्रिटिशांच्या काळापासून योजना -
ब्रिटिश सरकारने १८८४ साली केवळ पोस्टातील कर्मचायांसाठी कल्याणकारी योजना म्हणून वा योजनेला मंजुरी दिली. नंतर १८८८ सालापासून टेलिग्राफ विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेत सामील करण्यात आले. विशेष म्हणजे १८९४ पासून महिला कर्मचाऱ्यांनाही पोस्टल लाइफ इन्शुरन्स मिळू लागला.
या आहेत योजना
आजीवन विमा योजना (सुरक्षा), बंदोबस्ती विमा योजना (संतोष), परिवर्तनीय विमा योजना (सुविधा), १५ आणि २० वर्षे मुदतीची मनी बैंक योजना (सुमंगल), दाम्पत्याची संयुक्त विमा योजना (युगल सुरक्षा) आणि लहान बालकांसाठीची (बाल जीवन विमा) ही त्या योजनांची नावे.एका व्यक्त्तीस सर्व योजनांत मिळून जास्तीत जास्त ५० लाख रुपयांचा विमा घेता येतो. लाखांच्यावर विमा हवा असल्यास वैद्यकीय तपासणी केली जाते. कोणत्याही योजनेत किमान २०,००० रुपये आणि कमाल ५० लाख रुपयांचा विमा घेता येतो.
इथे तपासा अद्ययावत माहिती
http://www.postallifeinsurance.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच 'पोस्ट इन्फो postinfo अॅप आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यास यातून विविध योजनांसह सर्व बाबींची पूरक माहिती मिळणे सोपे होईल,