Lokmat Money >विमा > ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखापर्यंतचा विमा; जाणून घ्या कसा करावा क्लेम...

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखापर्यंतचा विमा; जाणून घ्या कसा करावा क्लेम...

एटीएम कार्डवर मिळतो विमा? खरंच...! चला तर समजून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:17 PM2022-08-16T16:17:01+5:302022-08-16T16:26:27+5:30

एटीएम कार्डवर मिळतो विमा? खरंच...! चला तर समजून घेऊया...

Free life and accident insurance up to 5 lakhs on ATM card Know how to make a claim | ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखापर्यंतचा विमा; जाणून घ्या कसा करावा क्लेम...

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखापर्यंतचा विमा; जाणून घ्या कसा करावा क्लेम...

पुणे : सध्या खूपच कमी लोक असे असतील जे एटीएम (ATM Card) कार्डचा उपयोग करत नसतील. प्रधानमंत्री जन-धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आणि रुपे कार्डमुळे (RuPay Card) आता एटीएम प्रत्येकाच्या रोजच्या व्यवहारातील मुख्य साधन बनले आहे. यामुळे व्यवहारासाठी किंवा खरेदीसाठी बरेच जण एटीएमचा वापर करत आहेत. एटीएमच्या वापरामुळे कागदी चलनाचा म्हणजेच नोटांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच एटीएमचा वापरही सोपा आहे. आपलं सर्व काम आपण एका कार्डवर करू शकतो. विविध वस्तूंच्या खरेदीपासून ते पेट्रोल, डिझेल किंवा इतर कोणत्याही दुकानात वस्तू किंवा सामान खरेदी करताना एटीएमद्वारे व्यवहार करता येतो. एटीएम कार्डच्या या फायद्यासोबतच त्याचे अनेक फ्री ऑफर आणि फायदे आहेत जे बऱ्याच जणांना माहित नाहीयेत. त्यामुळे एटीएम वापरकर्ते त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत. चला तर या लेखात जाणून घेऊया नेमके एटीएमचे इतर फायदे कोणते ते....

एटीएम कार्डसोबत मिळणारी सर्वात महत्त्वाची आणि ग्राहकांच्या उपयोगाची सेवा म्हणजे विमा. बँक ज्यावेळी एखाद्या ग्राहकाला एटीएम कार्ड देते त्यावेळी त्यासोबत ग्राहकांना अपघात विमा (Accidental insurance) किंवा अवेळी येणाऱ्या मृत्यूचा विमाही (Life Insurance) देत असते. बँकेकडून मिळणाऱ्या या विम्याची माहिती ग्राहकांना नसल्याने अनेक ग्राहक यावर क्लेम करू शकत नाहीत. आपल्यात असणाऱ्या कमी वित्तीय साक्षरतेमुळे या अशा विम्यांपासून अनेक जण दूर राहतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे सोडा इथं शहरातील शिक्षित लोकही एटीएमसोबत असणाऱ्या नियम आणि शर्तींकडे दुर्लक्ष करतात. तर दुसऱ्या बाजूला अनेक बँकाही आपल्या ग्राहकांना याची माहिती देत नाहीत.

कोणत्या कार्डवर किती विमा मिळतो?

ग्राहकाचे एखाद्या राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेत खाते असेल आणि त्याचे एटीएम त्या  ग्राहकाने कमीत कमी 45 दिवस उपयोग केले असावे. तर तो ग्राहक एटीएम कार्डसोबत मिळणाऱ्या विम्यावर दावा करू शकतो. बँक ग्राहकांना अनेक प्रकारची एटीएम इश्यू करते. त्या एटीएम कार्डच्या कॅटेगरीनुसार त्यासोबत मिळणाऱ्या विम्याची रक्कम ठरलेली असते. ग्राहकांना क्लासिक कार्ड (Classic Card) सोबत 1 लाख रुपये , प्लॅटेनम कार्ड (Platinum Card) सोबत 2 लाख रुपये, सामान्य मास्टर कार्ड ( Master Card) सोबत 50 हजार, प्लॅटेनम मास्टर कार्ड (Platinum Master Card) वर 5 लाख आणि वीजा कार्डवर (Visa Card) 1.5 ते 2 लाख रुपयांचे इंशुरन्स कव्हरेज (Insurance Coverage). प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना मिळालेल्या रुपे कार्डवर (RuPay Card Insurance) 1 ते 2 लाखांचे विमा कवच मिळते.

ATM विम्यासाठी दावा कसा करावा?

जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी ठरला आणि एका हाताने किंवा एका पायाने अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास, 01 लाख रुपयांचा विमा लाभ उपलब्ध आहे. मृत्यूच्या बाबतीत, कार्डवर अवलंबून, कव्हरेज 1 लाख ते 5 लाखांपर्यंत असते. एटीएम कार्डसोबत उपलब्ध असलेल्या विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला (insurance nominee) संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागतो. बँकेत एफआयआरची प्रत, हॉस्पिटलमधील उपचाराचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्यावर विमा दावा प्राप्त होतो. मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नॉमिनीने मृत्यूचा दाखला, एफआयआरची प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी सादर करावे लागतील.

Web Title: Free life and accident insurance up to 5 lakhs on ATM card Know how to make a claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.