Join us

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नाही येणार कोणतीही समस्या

By जयदीप दाभोळकर | Published: November 04, 2024 2:19 PM

Health Insurance Tips: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायला हवी.

Health Insurance Tips: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्सच्या मदतीनं तुम्ही तुमचं आयुष्य सुरक्षित करू शकता. आजच्या काळात धोकादायक आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळेच आजकाल प्रत्येकाकडे आरोग्य विमा असणं अत्यंत गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्सच्या मदतीनं तुम्ही कठीण काळात वैद्यकीय खर्च टाळू शकता. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर हेल्थ इन्शुरन्स घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.हेल्थ इन्शुरन्स आणि फायदेजर तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर तुम्हाला इन्शुरन्स, कव्हरेजचे सर्व फायदे माहित असायला हवेत. तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीबद्दल नीट जाणून घेणं आवश्यक आहे. घाईगडबडीत विमा पॉलिसी वाचू नका. पॉलिसीमध्ये विम्याचे कव्हरेज आणि फायदे जसे की रुग्णालयात दाखल होण्याचे निकष किंवा औषधांची किंमत इ. स्पष्टपणे नमूद केले पाहिजेत.हॉस्पीटलचं नेटवर्क पाहाआरोग्य विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना कॅशलेस उपचाराची सुविधा देतात. यासाठी विमा कंपन्या विविध रुग्णालयं आणि आरोग्य सेवा केंद्रांशी जोडलेल्या असतात. अशावेळी हेल्थ इन्शुरन्स घेताना या सर्वांची माहिती घेतली पाहिजे.कस्टमर सर्व्हिस आणि सपोर्टआपण ज्या विमा कंपनीकडून आरोग्य विमा घेत आहात, त्या कंपनीच्या ग्राहक सेवेबद्दल आणि सपोर्टबद्दल एकदा माहिती करून घ्या. अनेकदा कंपन्या पॉलिसीधारकाला मदत करत नाहीत. अशा परिस्थितीत आपण कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हिस आणि सपोर्टचा इतिहास तपासला पाहिजे.

 

टॅग्स :आरोग्य