आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स हे आजच्या काळात अत्यावश्यक आहे. जगभरातील आरोग्यसेवेच्या वाढत्या खर्चामुळे, हा विमा कोणत्याही वैद्यकीय खर्चाच्या किंवा गंभीर आजाराच्या बाबतीत आर्थिक मदत पुरवतो. एखाद्या व्यक्तीचं वय जसजसं वाढत जातं तसतसं आरोग्य विमा अधिक महत्वाचा ठरतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना निवडणं ही एक कठीण प्रक्रिया असू शकते. विमा खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाच्या हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरेज आणि प्रीमियम समाविष्ट आहे की नाही हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.
पूर्वीपासून असलेल्या आजारांबद्दल नियमअनेक इन्शुरन्स पॉलिसी पहिल्यापासून अससेल्या आजारांबाबत काही नियम आणि अटी टाकतात. विमा कंपन्या यासाठी अधिक प्रीमिअम घेऊ शकतात किंवा या आधारावर पॉलिसी देण्यासही मनाई करू शकतात. इन्शुरन्स निवडण्यापूर्वी ते नियम आणि अटी वाचणं आवश्यक आहे. तसंच कोणते आजार पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात हे पाहणं आवश्यक आहे.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्चहा रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्चा रेफर करतो, ज्यासाठी एखाद्याला भरती करण्यात आलं होतं. साधारणपणे, या खर्चासाठी पात्रता कालावधी ६०-९० दिवस असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी, अनेक विमा कंपन्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चासाठी रक्कम मर्यादित करू शकतात.
प्रीमिअम आणि डिडक्टिबलज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम सामान्यपणे तुलनेनं अधिक असतो. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या बजेटवरही लक्ष दिलं पाहिजे आणि ते प्रीमिअम आणि आपल्या खिशातून खर्च करू शकतात का हे पाहिलं पाहिजे.
को पेमें आणि सब लिमिटसब लिमिटचा अर्थ हा आहे की सर्वाधिक रक्कम जे एक पॉलिसी होल्डर कोणत्या एका विशेष प्रक्रियेद्वारे मिळवू शकतो. को-पेमेंटचा अर्थ त्या पैशांशी असतो, जो दाव्याच्या एका हिस्स्यासाठी आपल्या बजेटमधून करावा लागतो. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्येष्ठ नागरिकांना निरनिराळे पेमेंट आणि सबलिमिट देतात. व्यक्तीनं अशा विम्याची करावी जी मिनिमम को पेमेंट आणि सब लिमिट देते.