Join us  

वाहनाचा अपघात झाल्यानंतर Insurance क्लेम कसा करतात? एक चूक महागात पडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 4:36 PM

Motor Insurance: तुम्ही तुमच्या कारचा विमा काढला असेल तर त्याचा क्लेम कसा करायचा याची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी धावपळ होऊ शकते.

Motor Insurance: दिवसेंदिवस रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघात होण्याचं प्रमाणही वाढतचं चाललं आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे वाहनाचा अपघात विमा असणे आवश्यक आहेत. मात्र, फक्त इन्शुरन्स घेतला म्हणजे काम संपलं असं होत नाही. कुठल्याही वाहनाचा विमा दावा कसा करायचा? याचाही माहिती असणे गरजेचं आहे. इन्शुरन्स क्लेम करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही चांगल्या तयारीने विमा दावा केला तर तुम्हाला चांगला दावा मिळण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, एक छोटीशी चूक तुमचा दावा नाकारू शकते. तुम्ही ऑनलाइन देखील कार इन्शुरन्स क्लेम कसा करू शकता.

कार इन्शुरन्स क्लेम कार विम्याचा दावा करण्यापूर्वी, कोणकोणत्या प्रकारचे दावे आहेत, हे माहिती असायला हवे. साधारणपणे दोन प्रकारचे दावे बाजारात उपलब्ध असतात.Cashless Claim : या अंतर्गत, विमा कंपनीने ठरवून दिलेल्या गॅरेजमध्ये कारची दुरुस्ती केली जाते. कंपनी विमा पॉलिसी अंतर्गत गॅरेजच्या दुरुस्तीचा खर्च देते. निवडक कंपन्या मोफत पिक आणि ड्रॉप सुविधा देखील देतात. या प्रकारात तुम्हाला खिशातून पैसे देण्याची गरज पडत नाही.Reimbursement Claim: या प्रकरणात, आपण विमा कंपनीला कारच्या नुकसानीबद्दल माहिती देतो. तुमच्या आवडीच्या गॅरेजमध्ये जाऊन तुम्ही तुमची कार दुरुस्त करून घेऊ शकता. गाडी दुरुस्त केल्यावर, जो खर्च येईल त्याची सर्व बिले विमा कंपनीकडे पाठवावी लागतात. अशा प्रकारे दुरुस्तीसाठी खर्च केलेला पैसा वसूल केला जातो.

ऑनलाइन कार विमा दावा कसा करावाआता तुम्ही ऑनलाईनही विम्याचा दावा करू शकता. लक्षात ठेवा की प्रत्येक विमा कंपनीच्या नियम आणि अटी वेगवेगळ्या असतात. याशिवाय काही कंपन्याच ऑनलाइन क्लेम करण्याची सुविधा देतात.

कंपनीला कळवा : कारचा अपघात झाला किंवा खराब झाली तर लगेच विमा कंपनीला कळवा. वेळेवर माहिती न दिल्यास, कंपनी दावा नाकारू शकते. तुम्ही कंपनीशी त्याच्या टोल-फ्री नंबर आणि ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

एफआयआर नोंदवा : रस्ता अपघात झाल्यास पोलिसांकडे एफआयआर नोंदवा. कारचे कसे नुकसान झाले याची संपूर्ण माहिती लिहा. याशिवाय तुम्हाला किंवा कोणतीही व्यक्ती जखमी झाली असेल तर हे तपशीलही एफआयआरमध्ये असले पाहिजेत.

ऑनलाइन क्लेम फॉर्म भरा : जर तुमची विमा कंपनी ऑनलाइन क्लेम करण्याची सुविधा देत असेल, तर तुम्ही तिच्या वेबसाइटवर जाऊन क्लेम फॉर्म भरू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती द्यावी लागेल, जसे की कारचे कसे नुकसान झाले, कोणाला दुखापत झाली इत्यादी तपशील. याशिवाय योग्य कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर विमा कंपनी तुमचा क्लेम फॉर्मची पडताळणी करेल. कारची तपासणी देखील केली जाऊ शकते. कॅशलेस योजना आणि प्रतिपूर्ती, तुमच्या योजनेनुसार दावा स्वीकारला जाईल. अशा प्रकारे तुम्ही कारचा विमा दावा सहज मिळवू शकता.

(डिस्क्लेमर : कार विमा दाव्यांबाबत विमा कंपन्या वेगवेगळी भूमिका घेतात. ऑनलाइन दावा करण्यापूर्वी कंपनीकडून माहिती घेण्यास विसरू नका.) 

टॅग्स :कारअपघात