चंद्रकांत दडस, उपसंपादक
विमाधारकाच्या मृत्यूनंतर, विमा कंपनी पॉलिसीच्या कागदपत्रांनुसार पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला जीवन विम्याचा लाभ देते, जेव्हा एखादी विमा कंपनी नॉमिनीला विम्याची रक्कम आणि इतर फायदे देते तेव्हा त्याला क्लेम सेटलमेंट म्हणतात. कंपन्यांनी ३० दिवसांच्या आत दावा निकाली काढणे आवश्यक आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा करावा हे जाणून घेऊ..
कशाची होते मागणी?अपघाती मृत्यू झाल्यास कंपनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि एफआयआरची प्रत मागू शकते.
दावा कसा करायचा?आवश्यक कागदपत्रे काय? विमाधारक व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, मूळ पॉलिसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच विमा कंपनीला इतर कागदपत्रे हवी असतील तर ती द्यावी लागतात. पॉलिसी इश्यू झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत केलेल्या मृत्यूच्या दाव्यांसाठी संशय आल्यास विमा सेवा कंपन्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी स्वतंत्र तपासणी करू शकतात.
डेथ क्लेममृत्यूच्या बाबतीत, नॉमिनी असलेल्या व्यक्तीने प्रथम त्याच्या जीवन विमा कंपनीला मृत्यूची माहिती दिली पाहिजे. मृत्यूचा दावा करणायांना तपशीलवार फॉर्म भरावा लागेल. यामध्ये विमाधारकाचे नाव, पॉलिसी क्रमांक मृत्यूचे कारण, मृत्यूची तारीख, मृत्यूचे ठिकाण, दावेदाराचे नाव अशी माहिती द्यावी लागेल. हा फॉर्म तुम्हाला विमा कंपनीच्या संकेतस्थळावर मिळू शकतो.
रायडरचे दावेविमा पॉलिसी घेताना अनेक वेळा लोक गंभीर आजार, अपघात, प्रीमियमची माफी असे अनेक रायडर्स घेतात. अशा प्रकरणांमध्ये दाव्याची प्रक्रिया वेगळी असते. अशा दाव्याच्या प्रकरणांमध्ये, विमा कंपनी एफआयआरची प्रत. रुग्णालयाचे अहवाल इत्यादी मागू शकते.
म्युरिटी आणि सरव्हायवल संबंधित दावेपॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर, विमा कंपनी पॉलिसीधारकाला आगाऊ माहिती देते. विमा कंपनी पॉलिसीधारकाला पॉलिसी डिस्चार्ज फॉर्म पाठवते. विमाधारकाला मूळ पॉलिसी दस्तऐवज, ओळखीचा वेध पुरावा, बँकेच्या पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक प्रदान करावा लागेल. त्यानंतर दाव्याची प्रक्रिया सुरु होते.