Lokmat Money >विमा > इन्शुरन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कोणते आहेत या क्षेत्रातील महत्त्वाचे भाग?

इन्शुरन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कोणते आहेत या क्षेत्रातील महत्त्वाचे भाग?

पाहा कोणत्या आहेत इन्शुरन्स बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या संस्था. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:43 AM2023-09-01T11:43:58+5:302023-09-01T11:44:29+5:30

पाहा कोणत्या आहेत इन्शुरन्स बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या संस्था. 

Job opportunities in insurance sector what are the key areas in this sector know from expert | इन्शुरन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कोणते आहेत या क्षेत्रातील महत्त्वाचे भाग?

इन्शुरन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कोणते आहेत या क्षेत्रातील महत्त्वाचे भाग?

प्रितीष किशोर गोविंदपुरकर

खरं तर इन्शुरन्स या विषयावर कोणी सांगत असेल किंवा त्या बदल माहिती देत असेल तर ती ऐकण्याची मानसिकता आजही आपल्यामध्ये खूप कमी आहे, असा एक सर्व्हेक्षणाचा अहवाल २०२१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. इन्शुरन्स आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक असल्यानं त्याची माहिती ठेवणं आवश्यकच आहे. आपल्याकडे इन्शुरन्स बाबतीत शिक्षण देणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. 

कोणत्या आहेत मुख्य संस्था
-कॉलेज ऑफ इन्शुरन्स, मुंबई
-इन्शुरन्स अकादमी, पुणे
-एमटी स्कूल ऑफ इन्शुरन्स अँड सायन्स, नोएडा
-बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ मॅनॅजमेण्ट अँड टेकनॉलॉजी, नवी दिल्ली
-इन्स्टिटीयूए ऑफ इन्शुरन्स अँड रिस्क मॅनॅजमेंट, हैदराबाद
-दिल्ली इन्शुरन्स इन्स्टिट्युट, जनपथ दिल्ली
-एचआरडी फाऊंडेशन इंडिया दिल्ली
-उदयपूर इन्शुरन्स इन्स्टिट्युट, राजस्थान
-भोपाळ इन्शुरन्स इन्स्टिट्युट, मध्य प्रदेश
-इंडियन मॅनेजमेंट ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्युट, जालंधर पंजाब

सर्वात महत्वाची स्थापन संस्था म्हणजे - इंडियन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (INSURANCE REGULATORY AND  DELVELOPMENT AUTHORITY OF INDIA) म्हणजेच IRDAI. याची स्थापनी ही १९९९ ला झाली. त्यांचं मुख्य कार्यालय हे हैदराबाद येथे आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इंडीयाच्या अंतर्गत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. ही स्वायत्त संस्था भारतीय बाजार मधील सर्व इन्शुरन्सच्या बाबतीत धोरण ठरविणे आणि नियम बनविणे याचे काम करते. प्रत्येक खाजगी किंवा सरकारी विमा कंपनीला योग्य तो मार्ग दाखिवणे व मूळ ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे त्यांचे काम आहे.

तसंच प्रत्येक विमा कंपनीचं मानांकन आणि ऑडिट करायचं कामदेखील ही संस्था करते. या संस्थेची एक गव्हर्निंग बॉडी असते, ज्या मध्ये खाजगी आणि सरकारी संस्थेमधील नियुक्त व्यक्ती असतात. आयएएस कॅडरचा व्यक्ती या संस्थेचा संचालक म्हणून काम बघतो.

रोजगाराच्या संधी
सध्या भारत सुमारे ३८ लाईफ आणि नॉन लाईफ कंपन्या रजिस्टर आहेत. अलीकडच्या काळत अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या खूप संधी निर्माण होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये करियर घडविण्यासाठी उच्चशिक्षित असणं आवश्यकच आहे असं नाही, कोणत्याही क्षेत्रमधील पदवीधर या क्षेत्रात येऊ शकतो. ज्याकडे एमबीए सारखी पदवी असेल अशा व्यक्तींना या क्षेत्रात अधिक संधी आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरच्याही संधी उपलब्ध आहेत. केवळ माहिती नसल्यामुळे आणि पूर्वीपासून या क्षेत्राला चुकीचे करियर क्षेत्र म्हणून पहिल्यामुळे खुप अशा विविध संधी असूनदेखील इन्शुरन्स क्षेत्राकडे लोकांचा कल कमी आहे. अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अजून पाहिजे तितका सामाजिक दर्जा दिला जात नाही ही एक शोकांतिका आहे..

पदवी न मिळालेले उमेदवार या क्षेत्र मध्ये विमा एजन्ट किंवा विमा प्रतिनिधी म्हणून १०वी किंवा १२वी च्या शिक्षणावर काम करू शकतात. त्यामुळे संयमरोजगारच्या संधी उपलब्ध आहेत. विमा प्रतिनिधींना विमा कंपनी योग्य ते शिक्षण आणि ट्रेनिंग देते. मूळात विमा प्रतिनिधीचे काम योग्य त्या ग्राहकाला योग्य ते विम्याचे ज्ञान देणे आहे. त्यानंतर सर्व माहिती देऊनच त्याला पॉलिसी विकणे बंधनकारक आहे. आज विमा प्रतिनिधींच्या मार्फत तयार झालेल्या नेटवर्कमुळेच सर्वसामान्य लोकांना इन्शुरन्सची जाण झाली आहे. गावोगावी मूळ व्यवसाय करत बरेच विमा प्रतिनिधी जोड धंदा म्हणून हा व्यवसाय करत आहेत.

दोन महत्ताचे भाग
जीवनविम्याचा मूळ उद्देश हा जोखीमे पासून बचाव करणं आणि धोका कमी करणे हा असतो. इन्शुरन्स सेक्टर मूळ २ मुख्य भागांमध्ये विभाजित आहेत
१ LIFE INSURANCE (आयुर्विमा किंवा जीवनविमा )
२ NON LIFE INSURANCE (जीवनविम्या व्यतिरिक्त )
विम्याचे अनेक प्रकार आहेत जसे की - लाईफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, लायबिलिटी इन्शुरन्स आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स आहेत.

सध्या विम्याचा प्रचार आणि प्रसार जोरात होताना दिसत आहे. २०२० च्या जागतिक महासाथीनं विम्याचं महत्व अजूनच वाढवलंय. इन्शुरन्स सेक्टरमध्ये मार्केटिंग मध्ये खूप रोजगाराच्या संधी आहेत जसं की  विमा प्रतिनिधीद्वारे विक्री, बँकेद्वारे विक्री, ब्रोकरद्वारे विक्री, डायरेक्ट विक्री आणि ऑनलाईन विक्री. यासाठी केवळ योग्य ते संभाषण कौशल्य आणि माहिती असणे बंधनकारक आहे.
इन्शुरन्स सेक्टर हे विमा लोकपालांच्या अंतर्गत येते. त्याला IRDAI OBUDSEMENT असंदेखील म्हणतात. मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्रानं असे काही वळण घेतले आहेत की आज मोठ्या संख्येने तरुण वर्ग उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी म्हणून विमा क्षेत्राकडे पाहत आहेत.

(लेखक हे विमा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Job opportunities in insurance sector what are the key areas in this sector know from expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.