LIC Policy: जर तुमची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (LIC ) काही कारणास्तव बंद झालेली असेल, तर तुम्ही सोप्या पद्धतीने ती परत सुरू करू शकता. बंद पडलेल्या पॉलिसीबाबत आता काळजी करण्याची गरज नाही. LICने अशाच बंद पडलेल्या पॉलिसीज पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
एलआयसीची विशेष मोहीम 17 ऑगस्टपासून सुरू झाली असून 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत, त्या सर्व बंद केलेल्या पॉलिसी पुन्हा चालू केल्या जाऊ शकतात, ज्या ULIP च्या श्रेणीत येत नाहीत. तुमची कोणतीही पॉलिसी अनेक महिन्यांपासून बंद असेल, तर तुम्ही दंड भरून ती पुन्हा सुरू करू शकता. या मोहिमेअंतर्गत एलआयसी दंडात सूट देत आहे.
LIC GIVES A UNIQUE OPPORTUNITY FOR POLICYHOLDERS TO REVIVE THEIR LAPSED POLICIES.#LICI#LICpic.twitter.com/fItYZsZKry
— LIC India Forever (@LICIndiaForever) August 17, 2022
एलआयसीने ट्विटर हँडलवरून आपल्या ग्राहकांच्या नावाने एक प्रेस रिलीज जारी केले आहे. एलआयसीने म्हटले की, ज्या ग्राहकांची पॉलिसी बंद झाली आहे, त्यांना ती पॉलिसी सुरू करण्याची संधी मिळत आहे. ULIP लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स वगळता बाकीच्या सर्व बंद झालेल्या पॉलिसीज सुरू होऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे, पॉलिसी बंद केल्याच्या दिवसापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसी सुरू केली जाऊ शकते.
LIC काय म्हणाली?
LIC ने मायक्रो इंश्योरेंस पॉलिसीवर ग्राहकांना दंडात 100% सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे लहान पॉलिसी असलेल्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि कोणतेही शुल्क न भरता त्यांचे जोखीम संरक्षण पुन्हा सुरू होईल. पॉलिसी धारकाचे 1 लाख रुपये प्रीमियम शिल्लक असेल तर विलंब शुल्कावर 25 टक्के सूट मिळेल. सूटची कमाल मर्यादा 2,500 रुपये ठेवण्यात आली आहे. 1 लाख ते 3 लाख रुपयांच्या थकबाकी प्रीमियमवर 3,000 रुपयांपर्यंत कमाल सूट दिली जाईल. प्रीमियम रु. 3 लाखांपेक्षा जास्त असेल तर विलंब शुल्कावर 30% सूट दिली जाईल. सूटची कमाल मर्यादा 3500 रुपये ठेवण्यात आली आहे.