Lokmat Money >विमा > LIC ची नवी जीवन किरण पॉलिसी लाँच; लाईफ इन्शूरन्ससह सेव्हिंग बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

LIC ची नवी जीवन किरण पॉलिसी लाँच; लाईफ इन्शूरन्ससह सेव्हिंग बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

या लाइफ इन्शूरन्स पॉलिसीमध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:13 PM2023-07-29T16:13:37+5:302023-07-29T16:14:23+5:30

या लाइफ इन्शूरन्स पॉलिसीमध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत.

LIC s New Jeevan Kiran Policy Launched Saving benefits with life insurance see details know premium | LIC ची नवी जीवन किरण पॉलिसी लाँच; लाईफ इन्शूरन्ससह सेव्हिंग बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

LIC ची नवी जीवन किरण पॉलिसी लाँच; लाईफ इन्शूरन्ससह सेव्हिंग बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

एलआयसीनं जीवन किरण लाईफ इन्शूरन्स पॉलिसी लाँच केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड इंडिव्युजुअल सेव्हिंग स्कीमसोबत लाईफ इन्शूरन्स स्कीम आहे. विमा पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो. तर, मॅच्युरिटीपर्यंत विमाधारक हयात असल्यास भरलेला एकूण प्रीमियम परत केला जातो.

एलआयसी जीवन किरण लाइफ इन्शूरन्स पॉलिसीमध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत.

मॅच्युरिटी बेनिफिट्स
एलआयसी जीवन किरण लाइफ इन्शूरन्स पॉलिसीचा मुख्य फायदा असा की एकूण प्रीमियमची जमा रक्कम मॅच्युरिटीवर विमाधारकाला दिली जाते. जर पॉलिसी लागू असेल तर मॅच्युरिटीवरील विमा रक्कम एलआयसीकडून नियमित प्रीमियम किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट अंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण प्रीमियम्सच्या बरोबरीची असते. पॉलिसी मॅच्युरिटीच्या तारखेनंतर लगेचच जीवन विमा संरक्षण रद्द केलं जाईल.

मृत्यू झाल्यास किती रक्कम

  • पॉलिसी सुरू झाल्यापासून मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रकमेचे पैसे त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येतात.
  • नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत, मृत्यू झाल्यास, वार्षिक प्रीमियमच्या ७ पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५ टक्के किंवा मूळ विम्याची रक्कम दिली जाईल.
  • सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत मृच्यू झाल्यास सिंगल प्रीमियमच्या १२५ टक्के रक्कम दिली जाईल. याशिवाय, मूळ विमा रक्कम दिली जाईल.
  • योजनेत पहिल्या वर्षादरम्यान आत्महत्या वगळता आकस्मिक मृत्यूसह सर्व प्रकारच्या मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे.
     

डेट बेनिफिट ऑप्शन
मृत्यू झाल्यास पेमेंटची पद्धत पॉलिसीधारकाच्या निवडीनुसार केली जाऊ शकते. ज्यामध्ये नॉमिनीला एकरकमी पेमेंटचा पर्याय दिला जातो. त्याच वेळी, नॉमिनीला व्यक्तीला एकूण रक्कम हप्त्यांमध्ये म्हणजेच ५ समान हप्त्यांमध्ये देण्याचा पर्याय देखील आहे. दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय संबंधित व्यक्ती आपल्या जीवनकाळात निवडू शकतो.

टेन्योर आणि अटी
एलआयसी जीवन किरण जीवन विमा पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम १५,००,००० आहे आणि कमाल मूळ विमा रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. गृहिणी आणि गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. पॉलिसीचा किमान कालावधी १० वर्षे आणि कमाल कालावधी ४० वर्षे आहे.

Web Title: LIC s New Jeevan Kiran Policy Launched Saving benefits with life insurance see details know premium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.