Join us

महाकुंभ मेळ्यात अवघ्या ५९ रुपयांत प्रवाशांना मिळतोय कोट्यवधींचा विमा! 'या' कंपनीची विशेष ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:25 IST

Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी प्रवाशांना अवघ्या ५९ रुपयांमध्ये विम्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये सर्व खर्चाचा समावेश असेल.

Maha Kumbh Mela 2025 :उत्तर प्रदेशमध्ये गंगाकिनारी असलेल्या प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दर १२ वर्षांनी हा महाकुंभ मेळा भरतो. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू आणि भाविक पवित्र गंगास्नान करण्यासाठी जमा होता. दरम्यान, PhonePe ने प्रयागराज येथे महाकुंभ मेळा २०२५ ला उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी विशेष विमा योजना सादर केली आहे. ही विमा योजना प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीच नाही तर अपघात आणि प्रवासात काही व्यत्यय आल्यासही संरक्षण देते.

फक्त ५९ रुपयांना मिळेल विमामहाकुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रवाशांना केवळ ५९ रुपयांचा विमा मिळू शकतो. ही विमा योजना २ प्रकारात उपलब्ध आहे.ट्रेन किंवा बसने प्रवास करणाऱ्यांसाठी विमा ५९ रुपयांपासून सुरू होतो.तर देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विम्याची रक्कम ९९ रुपये आहे.

PhonePe ने सांगितले की, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या भागीदारीत ही ऑफर पॉलिसी आहे, जगातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक मेळाव्यातील उपस्थितांसाठी आर्थिक संरक्षण यात मिळते.

विम्यामध्ये काय कव्हर असेल?

  • रुग्णालयाचा खर्च आणि बाह्यरुग्ण उपचार.
  • डॉक्टरांचा सल्ला.
  • वैयक्तिक अपघात कव्हर.
  • तपासलेल्या सामानाच्या नुकसानीची भरपाई.
  • ट्रिप रद्द करणे आणि कनेक्टिंग फ्लाइट सुटल्यास.

योजनेसाठी कसा करायचा अर्ज?२५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रवासी PhonePe अ‍ॅपवर प्लॅन खरेदी करू शकतात. यासाठी, PhonePe अ‍ॅप उघडा आणि विमा पर्याय निवडा. येथे 'महा कुंभ विमा' चा पर्याय निवडा. उत्पादन तपशील तपासा आणि 'खरेदी करा' वर क्लिक करा. यात स्वतःसाठी एक योजना निवडा, तपशील भरा आणि पेमेंट पूर्ण करा.

कुंभ मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यातमहाकुंभ मेळा १३ जानेवारीपासून सुरू होणार असून २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेश सरकार पोलीस आणि प्रशासनाच्या सहकार्याने काम करत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच व्यवस्थेचा आढावा घेतला. पुढील काही आठवड्यांत लाखो लोकांचा ओघ अपेक्षित असताना, सुरक्षा, निवास आणि वाहतूक व्यवस्था यांचीही तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :कुंभ मेळाउत्तर प्रदेशहिंदू