Lokmat Money >विमा > आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल

आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल

Life Insurance Premium: आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. तुम्हाला विम्याचा हप्ता जास्त वाटत असेल तर तुम्ही एक ट्रीक वापरुन १० ते १५ टक्के पैसे वाचवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:51 AM2024-09-30T10:51:00+5:302024-09-30T10:51:58+5:30

Life Insurance Premium: आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. तुम्हाला विम्याचा हप्ता जास्त वाटत असेल तर तुम्ही एक ट्रीक वापरुन १० ते १५ टक्के पैसे वाचवू शकता.

multi year insurance policy can save your 10 to 15 percent premium payment amount | आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल

आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल

Life Insurance Premium : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही. अगदी हसत्याखेळत्या लोकांचा डोळ्यांसमोर जीव गेल्याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती असतील. आज जागतिक हृदय दिन देखील आहे. आजकाल हृदयविकार अगदी सामान्य झाला आहे. अगदी लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत हृदयाच्या समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा एकटे राहणारे व्यक्ती असाल, प्रत्येकाने त्यांच्या आरोग्याचा विचार करून विमा काढलाच पाहिजे. महागाईच्या काळामध्ये जीवन विमा असो किंवा आरोग्य विमा प्रीमियम वाढतच चालले आहेत. मात्र, काही टीप्स वापरुन तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.

विमा प्रीमियमवर १०% ते १५% ची संभाव्य बचत
अशा परिस्थितीत, तुमच्या विमा हप्त्यात १० ते 15 टक्के टक्क्याची बचत झाली तर? विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. यासाठी तुम्हाला काही स्मार्ट टीप्स वापराव्या लागणार आहेत. मल्टी-ईअर आरोग्य पॉलिसी : ही एक अशा प्रकारची विमा योजना आहे, ज्यामध्ये विमा घेणाऱ्याला फक्त एकदाच प्रीमियम  भरावा लागतो. दरवर्षी ही पॉलिसी रिन्यूवल करण्याची गरज पडणार नाही.

मल्टी-ईअर विमा पॉलिसीचे फायदे
तुम्हाला माहितीच असेल की विमा पॉलिसीसाठी तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरावा लागतो. मात्र, मल्टी-ईअर विमा पॉलिसी अंतर्गत, अनेक विमा कंपन्या ग्राहकांना २ वर्ष किंवा ३ वर्षीय आरोग्य विमा योजना देतात. या अंतर्गत तुम्हाला २-३ प्रकारचे फायदे मिळतात.

पहिला फायदा
मल्टी-ईअर विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रीमियमवर भरघोस सूट मिळते.

दुसरा फायदा
तुम्हाला दरवर्षी विमा पॉलिसीच्या वाढत्या प्रीमियमचा त्रास सहन करावा लागत नाही.

सर्वात मोठा आणि तिसरा सर्वात मोठा फायदा
या प्रकारच्या पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही २ वर्षांसाठी पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला विम्याच्या प्रीमियमवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय ३ वर्षांच्या विम्यावर तुम्हाला १५ टक्क्यांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

Web Title: multi year insurance policy can save your 10 to 15 percent premium payment amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.