Lokmat Money >विमा > तुमच्या कुटुंबासाठी किती रुपयांचा Term Insurance योग्य आहे? असं करा गणित?

तुमच्या कुटुंबासाठी किती रुपयांचा Term Insurance योग्य आहे? असं करा गणित?

Term Insurance : टर्म इन्शुरन्स हे तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचे एक साधन आहे, जे कमावत्या सदस्याच्या निधनानंतर त्यांचे भविष्य सुरक्षित करते. मात्र, विम्याची रक्कम निवडणे अनेकांसाठी आव्हान असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:04 AM2024-11-10T11:04:30+5:302024-11-10T11:05:54+5:30

Term Insurance : टर्म इन्शुरन्स हे तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचे एक साधन आहे, जे कमावत्या सदस्याच्या निधनानंतर त्यांचे भविष्य सुरक्षित करते. मात्र, विम्याची रक्कम निवडणे अनेकांसाठी आव्हान असते.

personal finance life insurance importance how to calculate ideal coverage | तुमच्या कुटुंबासाठी किती रुपयांचा Term Insurance योग्य आहे? असं करा गणित?

तुमच्या कुटुंबासाठी किती रुपयांचा Term Insurance योग्य आहे? असं करा गणित?

Term Insurance : गेल्या काही वर्षात अकाली मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपघात ते विविध प्रकारचे आजार वाढल्याने अगदी तारुण्यातही लोकांचे जीव गेल्याचं तुम्हीही अनुभवलं असेल. अशा परिस्थितीत आपल्यावर अवलंबून असलेलं कुटुंब आर्थिक अडचणीत साडण्याची शक्यता असते. मात्र, यासाठी तुम्ही आधीच नियोजन केलं तर ही वेळ येणार नाही. सध्याच्या काळात आयुर्विमा (Term Insurance) हे तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्वाचे साधन आहे. कमावत्या सदस्याच्या निधनानंतर त्यांचे भविष्य सुरक्षित करते. मुलांचे शिक्षण, लग्न आणि भविष्यातील इतर गरजा पूर्ण करण्यास आयुर्विमा मदत करते. मात्र, किती रुपयांचा आयुर्विमा काढावा? हे अनेकांना कळत नाही. चला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.


योग्य आयुर्विम्याची रक्कम कशी निवडावी
वर्तमान उत्पन्न
तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट विमा संरक्षण पुरेसे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आपल्यानंतर कुटुंबाला उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई मिळावी. जेणेकरून ते कोणत्याही आर्थिक संकटात सापडणार नाही. या रकमेतून कुटुंबाला काही वर्षांसाठी आर्थिक हातभार मिळू शकतो. ज्यातून ते आपली घडी व्यवस्थित बसवू शकतात.

कुटुंबातील सदस्यांची संख्या
तुमच्या कुटुंबातील किती सदस्या तुमच्यावर अवलंबून आहेत? त्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजा विम्याची रक्कम ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला मुले असतील तर त्यांचे शिक्षण आणि भविष्यातील इतर खर्च लक्षात ठेवा. तसेच, पालक किंवा कुटुंबातील इतर वृद्ध सदस्य तुमच्यावर अवलंबून असल्यास त्यांच्या काळजीसाठीही पुरेशा रकमेची तरतूद करावी.

कर्ज
गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी यासारखी तुमची कोणतीही थकबाकी भरणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत कुटुंब या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त राहील. ही विमा रक्कम तुमची देणी फेडण्यास सक्षम असावी, जेणेकरून कुटुंबावर आर्थिक भार पडणार नाही.

भविष्यातील ध्येय
विम्याची रक्कम ठरवताना, तुमची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टेही लक्षात ठेवा. यामध्ये मुलांचे उच्च शिक्षण, लग्नाचा खर्च आणि इतर मोठ्या गुंतवणुकीसारख्या भविष्यातील गरजांचा समावेश असावा. ही उद्दिष्टे तुमचे विमा संरक्षण वाढविण्यात मदत करतात, जेणेकरून तुमच्या कुटुंबाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त मदत मिळू शकेल.


महागाईचा प्रभाव
काळानुरूप महागाई वाढतच जाते, त्यामुळे जगण्याचा खर्च वाढत जातो. महागाई लक्षात घेऊन विम्याची रक्कम निवडणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमची पॉलिसी भविष्यातही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकेल. विमा पॉलिसीचे नियमितपणे पुनरावलोकन करणे आणि अपडेट करणे या दिशेने उपयुक्त ठरू शकते.

किती रुपयांचा विमा उतरावा?
योग्य जीवन विम्याची रक्कम व्यक्तीपरत्वे बदलू शकते. त्यामुळे निर्णय घेताना वरील सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती ३५ वर्षांचा असून त्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये आहे. त्याला पत्नी आणि २ मुले आहेत. वार्षित उत्पन्नाच्या १० ते १५ टक्के केलं तर १ ते १.५० कोटींपर्यंत आयुर्विमा घेणे योग्य राहील. यामध्ये त्याच्या उत्पन्नाचा गुणाकार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि चालू दायित्वे यांचा समावेश करण्यात आला आहे.
 

Web Title: personal finance life insurance importance how to calculate ideal coverage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.