मॅच्युरिटीनंतर जीवन विमा पॉलिसीचे फायदे मिळविण्यासाठी तुम्ही कायदेशीररित्या पात्र असता. परंतु तुम्ही सर्व प्रीमिअम भरले असतील आणि पॉलिसी अॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला क्लेम मिळण्याचा अधिकार आहे. मॅच्युरिटी क्लेम मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि कागदी काम खूपच कमी आहे.
साधारणपणे, विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटी तारखेच्या एक महिना आधी, विमा कंपनी ग्राहकाला पॉलिसी डिस्चार्ज फॉर्म पाठवते. यामध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेशी निगडीत सर्व सूचना समाविष्ट असतात.
कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक?पॉलिसी डिस्चार्ज फॉर्म पॉलिसीधारकाने पूर्णपणे भरला पाहिजे. त्यावर तुमची स्वाक्षरीदेखील असली पाहिजे. याशिवाय दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे. अर्जासोबत खालील ५ कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.- ओरिजनल पॉलिसी डॉक्युमेंट- आयडी प्रुफची कॉपी- अॅड्रेस प्रुफची कॉपी- बँक डिटेल्ससह बँक मँडेट फॉर्म- एक कॅन्सल चेकदरम्यान, योग्यरित्या भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे मॅच्युरिटीच्या तारखेच्या ५ ते ७ दिवस आधी पोहोचला पाहिजे.
काय आहे प्रक्रिया?विमा कंपनीकडे कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवताच, विमा कंपनी मॅच्युरिटी क्लेमची प्रक्रिया सुरू करते. काही दिवसांत विमाधारकाला पेमेंट केलं जातं. मॅच्युरिटीची तारीख पूर्ण झाल्यानंतर पैसे थेट पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात पाठवले जातात.
हे लक्षात ठेवाही प्रक्रिया फक्त त्या विमा पॉलिसींना लागू आहे जी पॉलिसीधारकाच्या हयातीत बोनस किंवा इतर फायदे देतात. जर पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, परंतु पॉलिसी डिस्चार्ज प्रक्रिया पहिले पूर्ण झाली असेल, तर तो दावा मॅच्युरिटी क्लेम म्हणून गणला जाईल आणि विम्याची रक्कम पॉलिसीधारकाच्या कायदेशीर वारसांना दिली जाईल.