Join us  

PMJJBY : वार्षिक ४३६ रुपयांमध्ये तब्बल २ लाखांचा विमा; ही सरकारी योजना मुलाबाळांना देते आर्थिक सुरक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 1:55 PM

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : ही सरकारी योजना अवघ्या ४३६ रुपयांमध्ये तुमच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचं विमा संरक्षण देते. या योजनेत तुम्ही कधीही सहभागी होऊ शकता.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : सध्याच्या स्पर्धेच्या युगात कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती नाही. आपल्या आसपास निरोगी दिसणारेही लोक अचानक गेल्याचंही तुम्ही अनुभवलं आहे. यामध्ये अगदी तरुणांपासून ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश आहे. अशा स्थितीत आपल्यामागे आपल्या कुटुंबियांची फरफट होऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण महागडे टर्म इन्शुरन्स घेत असतात. मात्र, या विम्याचे हप्तेही कधीकधी आवाक्याबाहेर जातात. तुम्हीही यापैकीच एक असाल तर काळजी करू नका. सरकारने तुमच्यासाठी शुल्लक किमतीत एक योजना आणली आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही भारत सरकारची एक विमा योजना आहे. ही योजना कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण प्रदान करते. ही एक वर्षासाठीची योजना आहे. याचा कालावधी १ वर्षाचा आहे. दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करता येते. ही योजना बँका किंवा पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केली जाते. ही आयुर्विमा कंपन्यांमार्फत चालवली जाते. 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती ज्यांची बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाती आहेत ते या योजनेत सहभागी होऊ शकतात.

PMJJBYयोजनेचे फायदे काय आहेत?ही योजना म्हणजे एक प्रकारचा टर्म इन्शुरन्स आहे. १८ ते ५० वयोगटातील ग्राहकांना यामध्ये २ लाखांचा वार्षित टर्म इन्शुरन्स उपलब्ध करुन दिला जातो. कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला असल्यास या योजनेत कव्हर मिळतो. या योजनेसाठी, ग्राहकांना वार्षिक फक्त ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो, जो त्यांच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट होतो. या योजनेसाठी तुमचे बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.

योजनेचा कालावधीसाठी कसा असतो?वार्षिक प्रीमियम भरल्यावर PMJJBY अंतर्गत कव्हरेज १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी एक वर्षासाठी वैध आहे. प्लॅनच्या प्रीमियमच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कव्हर जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये घेतला तर तुम्हाला ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या योजनेत सामील झालात तर तुम्हाला फक्त ३४२ रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. आणि जर तुम्ही योजनेच्या शेवटी म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सामील झालात तर तुम्हाला अवघ्या ११४ रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो. याचा अर्थ असा की तुम्ही या योजनेत उशीरा सहभागी झालात तरीही तुम्हाला कव्हरचा पूर्ण लाभ मिळतो.

या गोष्टी लक्षात ठेवापहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना प्रीमियमच्या ऑटो डेबिटच्या तारखेपासून सुरू होते. म्हणजे जर तुम्ही १ तारखेला विमा घेतला असेल. तर पुढील महिन्याचा हप्ता गेल्यापासून ही योजना लागू होते. अशी स्थितीत पहिल्या पहिल्या ३० दिवसा झालेल्या मृत्यूसाठी (अपघातामुळे झालेले मृत्यू वगळता) विमा संरक्षण मिळत नाही.

टॅग्स :गुंतवणूक