Join us

Insurance : टर्म इन्शुरन्स घ्यावा की लाइफ इन्शुरन्स? दोन्हीपैकी कशात आहे सर्वाधिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 10:27 AM

जेव्हा आपण विमा हा शब्द साधं बोलाताना वापरतो तेव्हा आपण त्याच्या विविध प्रकारांचा विचार करत नाही. परंतु आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहित असणं आवश्यक आहे.

Life Insurance Vs Term Insurance: विमा ही एक अतिशय ब्रॉड टर्म आहे. जेव्हा आपण विमा हा शब्द साधं बोलाताना वापरतो तेव्हा आपण त्याच्या विविध प्रकारांचा विचार करत नाही. परंतु आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. 

उदाहरणार्थ, लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्समध्ये काय फरक आहे. विमा पॉलिसी पॉलिसीधारकाला कोणतीही दुर्घटना घडल्यास अनेक प्रकारे मदत करते. लाईफ, कार किंवा होम लोन असो, ही पॉलिसी लोकांना कोणत्याही अपघाताच्या वेळी स्वतःला आणि त्यांची प्रॉपर्टी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यास मदत करते. 

विमा निवडताना, लोकांना टर्म इन्शुरन्स घ्यावा की लाइफ इन्शुरन्स घ्यावा की नाही हा प्रश्न पडतो. पहिल्या नजरेत दोन्ही पॉलिसी तुम्हाला सारख्याच वाटू शकतात. पण, दोन्ही पॉलिसी अगदी वेगळ्या आहेत. मुदत आणि जीवन विमा एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत आणि तुमच्यासाठी कोणती पॉलिसी अधिक फायदेशीर ठरेल? त्याबद्दल जाणून घेऊया. 

लाईफ इन्शुरन्स काय आहे? 

जर प्रीमिअम भरत राहिले तर ही विमा पॉलिसी धारकाच्या आयुष्यभरासाठी वैध आहे. ही पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंब/नॉमिनीला आर्थिक मदत पुरवते. पॉलिसी कॅश व्हॅल्यू अमाउंट देखील देते, जे एक प्रकारचे बचत खाते आहे जे वर्षानुवर्षे वाढत राहते. पॉलिसी धारक हयात असताना रोख मूल्यावर कर्ज घेऊ शकतो. लाइफ इन्शुरन्सवर तुम्ही मॅच्युरिटी बेनिफिट्स, सरेंडर बेनिफिट्स, लॉयल्टी अॅडिशन्स इ. देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्ही टर्म प्लॅन, सेव्हिंग, मुलांवर केंद्रित योजना, रिटायरमेंटवर प्लॅन घेऊ शकता. 

टर्म इन्शुरन्स काय आहे? 

टर्म इन्शुरन्स हा असा फायनान्शिअल प्रोडक्ट आहे जो ठराविक वेळेसाठी निश्चित रक्कम देतो. हे अधिक परवडणारे आहे आणि तुम्ही ते एका ठराविक कालावधीसाठी खरेदी करू शकता. टर्म पॉलिसी देखील तुमच्या गरजेनुसार कस्टमाईज करता येते. टर्म इन्शुरन्समध्ये प्रीमियम स्वस्त पडतो. 

लाईफ वि. टर्म इन्शुरन्स 

डेथ बेनिफिट : टर्म इन्शुरन्समध्ये एखाद्या व्यक्तीला डेथ बेनिफिट तेव्हा मिळतं जेव्हा विमाधारकाचा मृत्यू लाभ टर्म पीरिअडदरम्यान होतो. दुसरीकडे, जीवन विमा पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीला पॉलिसी आणि मुदतपूर्तीनंतरही डेथ बेनिफिट्स मिळतात. 

इन्शुरन्स प्रीमिअम : टर्म इन्शुरन्स स्कीम तुम्हाला कमी पैशात जास्तीत जास्त परतावा देते. यासाठी तुम्हाला कमी प्रीमिअम भरावा लागतो. त्याच वेळी, लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम खूप महाग आहेत.  

पॉलिसी मध्ये बंद केल्यास : जर लाईफ इन्शुरन्स प्लॅन मध्येच बंद केली तर या पॉलिसीची पूर्ण रक्कम रिकव्हर करता येणार नाही. तुम्हाला केवळ प्रीमिअम म्हणून दिलेलीच रक्कम मिळेल. टर्म इन्शुरन्समध्ये जर व्यक्तीनं प्रीमिअम देणं बंद केलं तर बेनिफिट्स मिळणं बंद होईल आणि पॉलिसीही बंद होईल.

टॅग्स :व्यवसाय