Vehicle Insurance: तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तुम्हाला विम्याचे महत्व माहित असेल. विमा फक्त तुमच्या वाहनाचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला चालनापासून वाचवतो. अपघात किंवा चोरी झाल्यास वाहन विमा खूप उपयोगी ठरतो. पण वाहन विमा खरेदी करताना अनेक लोक गोंधळात असतात.
1st पार्टी विमा घ्यावा की 3rd पार्टी घ्यावा, या गोंधळात ते असतात. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही विम्यातील फरक सांगणार आहोत. विमा पॉलिसीच्या भाषेत सांगायचे झाले तर, वाहनाचा मालक किंवा ज्याच्या नावावर विमान आहे, त्याला फर्स्ट पार्टी म्हणतात. तसेच, इंश्योरेंस कंपनीला सेकंड पार्टी म्हणतात. तर, एखादा अपघात झाला तर जखमी व्यक्तीला किंवा विमा धारकाला थर्ड पार्टी म्हणतात.
काय आहे फर्स्ट आणि थर्ड पार्टी विमा
हा विमा पॉलिसी धारकाच्या वाहनाच्या संरक्षणासाठी बनवला आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा वाहन चोरी झाल्यास वाहन मालक विमा कंपनीकडे दावा दाखल करू शकतो. यामध्ये विमा कंपनी थर्ड पार्टी क्लेमदेखील कव्हर करते. उदाहरणार्थ, जर तुमच्या वाहनामुळे दुसरी व्यक्ती किंवा त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असेल, तर कंपनी तुमच्या वतीने दावा निकाली काढेल. दुसरीकडे थर्ड पार्टी विम्यामध्ये, केवळ थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान कव्हर केले जाते. किमतीच्या बाबतीत, तो फर्स्ट पार्टी इन्शुरन्सपेक्षा स्वस्त आहे. कायद्यानुसार, सर्व वाहनांचा किमान थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे.
कोणता विमा खरेदी करावा?
फर्स्ट पार्टी विमा खर्चाच्या दृष्टीने महाग असतो. परंतु चोरी आणि अपघाताच्या वेळी तो तुमच्या वाहनाला संरक्षण देतो. तुम्ही कोणता विमा घेत आहात हे तुमच्या बजेटवर अवलंबून आहे. पण, सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला फर्स्ट पार्टी विमा घेण्याचा सल्ला दिला जातो.