Join us  

तुमच्या आरोग्य विम्यात OPD कव्हर नाही? मग पॉलिसी असूनही खिशातून करावा लागेल हॉस्पिटलचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:23 PM

Opd Cover In Health Insurance : वर्षभरात आपण अनेकदा डॉक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी जातो. मात्र, विमा पॉलिसी असूनही हा सर्व खर्च आपल्याला खिशातूनच भरावा लागतो.

Opd Cover In Health Insurance : आपल्या आरोग्याबाबत लोक आता जागृत झाले आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षात आरोग्य विमा (Health Insurance) घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, अनेकदा आरोग्य विमा घेताना लोक चूक करतात. अशा परिस्थितीत विमा असूनही लोकांना उपचाराचा खर्च खिशातून भरावा लागतो. पारंपारिक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये बहुधा ओपीडी (Outpatient Department) कव्हर समाविष्ट नसते. म्हणजे पेशंटला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले नाही. तर डॉक्टरांची फी, चाचण्या आणि औषधांचा खर्च स्वतःच करावा लागतो. जर तुमच्या विमा पॉलिसीमध्ये ओपीडी कव्हर समाविष्ट नसेल तर तुमची पॉलिसी अपूर्ण आहे. हा कव्हर का आवश्यक आहे? ते जाणून घेऊ.

आरोग्याशी संबंधित एकूण खर्चाच्या ७०% ओपीडी खर्चाचा वाटा आहे. बहुतेक रोगांमध्ये, रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते, फक्त डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि चाचण्या आवश्यक असतात. आता विमा कंपन्या ओपीडी कव्हर इन-बिल्ट किंवा ॲड-ऑन म्हणून देत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसी घेताना, तुमच्या पॉलिसीमध्ये ओपीडीचा समावेश असल्याची खात्री करा किंवा ॲड-ऑन म्हणून त्याचा समावेश करा.

ओपीडी कव्हरमध्ये कोणता खर्च येतो?जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जातो, तपासणी करून घेतो किंवा कोणतीही चाचणी करून घेतो हा सर्व खर्च ओपीडीमध्ये येतो. तुमच्या विम्यात ओपीडी कव्हर नसेल तर हे सर्व पैसे खिशातून मोजावे लागतात.

डॉक्टरांचा सल्लाः ओपीडी कव्हरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी आकारले जाणारे शुल्क समाविष्ट आहे. जर कोणी आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये अनेक फेऱ्या माराव्या लागतात. प्रत्येक वेळी डॉक्टरांना सल्ला फी द्यावी लागते.निदान चाचण्या: आजार झाल्यास अनेक प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यापूर्वीच यावर बराच खर्च होतो. जर तुमच्या पॉलिसीमध्ये ओपीडीचा समावेश असेल तर तुमची या खर्चातून बचत होईल.औषधांचा खर्च : आजारांच्या उपचारासाठी औषधांवर खूप पैसा खर्च होतो. ओपीडी कव्हर अंतर्गत विमा कंपनी हे सर्व खर्च तुम्हाला देते.

या गोष्टी लक्षात ठेवाओपीडी कव्हरसह येणारी कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वर नमूद केलेल्या खर्चाव्यतिरिक्त, अनेक कंपन्या लॅब चाचण्या, क्ष-किरण, लसीकरण, डोळा, कान आणि दंत उपचारांवर झालेला खर्च ओपीडी कव्हर अंतर्गत देतात. त्यामुळे जास्तीत जास्त खर्च कव्हर करणारी अशी पॉलिसी घ्यावी. ओपीडी कव्हरसह येणाऱ्या काही पॉलिसींना प्रतीक्षा कालावधी असतो तर काहींमध्ये अशी कोणतीही अट नसते. त्यामुळे विमा पॉलिसी निवडताना ही गोष्टही लक्षात असणे आवश्यक आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यहॉस्पिटल