Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

विशेष म्हणजे या बाँडमध्ये आपण 1000 रुपयांपासूनही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या बॉन्ड्सच्या संबंधित प्रत्येक बाबीची उत्तरे दिली जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:10 AM2020-07-15T10:10:23+5:302020-07-15T10:12:16+5:30

विशेष म्हणजे या बाँडमध्ये आपण 1000 रुपयांपासूनही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या बॉन्ड्सच्या संबंधित प्रत्येक बाबीची उत्तरे दिली जातात.

Invest in Bharat Bonds from just Rs.1000 and get a definite profit | अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

आपण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असल्यास आपल्यासाठी भारत बाँड ईटीएफ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. खरं तर सरकार 17 जुलैपर्यंत भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणुकीची आणखी एक संधी देत आहे. विशेष म्हणजे या बाँडमध्ये आपण 1000 रुपयांपासूनही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या बॉन्ड्सच्या संबंधित प्रत्येक बाबीची उत्तरे दिली जातात.

भारत बॉन्ड ईटीएफ काय आहे?
हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. आपण बॉन्ड खरेदी करू शकता किंवा त्यात गुंतवणूक करू शकता. सरकार या बॉन्ड्सच्या माध्यमातून पैसे जमा करते. त्याचा हप्ता डिसेंबर 2019 मध्ये उघडण्यात आला, यातून 12,400 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता पुन्हा एकदा या बाँडच्या माध्यमातून 14 हजार कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य आहे. भारत बॉन्ड ईटीएफचा देशाच्या कॉर्पोरेट बाँडमध्ये समावेश आहे. यात अनेक फंड मॅनेजर देखील आहेत.

कोण गुंतवणूक करू शकेल आणि किती?
प्रत्येक लहान वा मोठा गुंतवणूकदार भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर हा बाँड तुमच्यासाठीही असेल. किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. भारत बॉन्ड ईटीएफला देशातील पहिला कॉर्पोरेट बॉन्ड म्हटले जाते. यात बरेच फंड मॅनेजरदेखील आहेत.

गुंतवणुकीचा काय फायदा होईल?
भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे निश्चित उत्पन्न आणि खात्रीशीर सुरक्षा. तसेच पारदर्शकता आणि कमी कर यामुळे ही योजना अधिक आकर्षक बनते. भारत बाँड ईटीएफचा परिपक्वता कालावधी एप्रिल 2025 आणि एप्रिल 2031 आहे. यासंदर्भात याची तुलना निश्चित परिपक्वता योजना आणि बँकिंग, पीएसयू फंडांशी करता येते. आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की, त्यामध्ये लॉकिंग सिस्टम नाही. म्हणजेच आपण कधीही खरेदी किंवा विक्री करू शकता. एलॉटमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांनंतर किंवा त्यापूर्वी गुंतवणुकीवरील भार ०.१०% असेल.

गुंतवणूक कशी करावी?
भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे डीमॅट खाते आवश्यक आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे डिमॅट नाही ते https://www.bharatbond.in/ या लिंकवर जाऊन गुंतवणूक करू शकतात. याद्वारे निधी आणि ईटीएफचा पर्याय उपलब्ध असेल. ईटीएफ त्याच लोकांची निवड करतात ज्यांचे डिमॅट खाते आहे, तसेच पुढील टप्प्यात आपणास नाव, पॅनकार्ड यांसारखी महत्वाची माहिती विचारली जाईल. यानंतर आपणास पेमेंट गेटवेवर जाऊन पेमेंट करावे लागेल. बँक खात्यातून पैसे कपातीनंतर भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा माहिती संदेश किंवा ईमेलद्वारे प्राप्त होईल.

हेही वाचा

कौतुकास्पद! IAS ऑफिसरनं दाखवले आपले CBSE बोर्डाच्या परीक्षेचे प्रशस्तिपत्रक अन् म्हणाले....

चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले

बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

Web Title: Invest in Bharat Bonds from just Rs.1000 and get a definite profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.