Lokmat Money > बिझनेस न्यूज > कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

investment Tips : आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:54 IST2025-04-21T15:54:06+5:302025-04-21T15:54:58+5:30

investment Tips : आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी.

investment become a millionaire tips learn easy ways to save and invest money | कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

investment Tips : आपण खूप पैसे कमावले म्हणजे श्रीमंत होऊ असा बहुतेक लोकांचा गोड गैरसमज झालेला दिसतो. त्यामुळे लोक पैसे कमावण्याच्या स्पर्धेत रात्रंदिवस धावत आहेत. पण, यातील अनेकांना कमावलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हेच माहिती नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे हातात उरत नाही, अशी ओरड प्रत्येकाची असते. उत्पन्न वाढवत राहणे जसे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा कमावलेल्या पैशातून बचत आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या लेखातून आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.

बचतीची सवय लावण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि नियमित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.

  • ५०-३०-२० नियम पाळा - तुमच्या पगाराचे योग्य नियोजन करा.
  • समजा तुमचे मासिक उत्पन्न ३०,००० रुपये आहे.
  • ५०% – जीवनावश्यक वस्तू (भाडे, रेशन, ईएमआय) =  १५,००० रुपये
  • ३०% – आनंद (प्रवास, खाणे, छंद) = ९,००० रुपये
  • २०% – बचत + गुंतवणूक = ६,००० रुपये

गुंतवणूक सुरू करा
बचतीचा काही भाग म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा रिअल इस्टेट अशा योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे आहे. एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - म्युच्युअल फंडमध्ये दरमहा थोडीशी रक्कम गुंतवा.

जर कोणी दरमहा १०,००० रुपयांची बचत करत असेल आणि ते फक्त बचत खात्यात ठेवत असेल (जिथे त्याला ५% व्याज मिळत असेल). दुसरी व्यक्ती SIP द्वारे म्युच्युअल फंडात तेच १०,००० रुपये गुंतवत असेल (जिथे त्याला १२% परतावा मिळत असेल), तर २० वर्षांनंतर दोघांच्या बचतीत मोठा फरक असेल.

या गोष्टी विसरू नका
गुतवणूक करण्यास सुरुवात करण्याआधी विमा घेणे महत्वाचे आहे, अन्यथा तुमची बचत वाया जाईल.
वैद्यकीय आणीबाणी किंवा अपघात झाल्यास तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल तर तुमची संपूर्ण बचत संपून जाईल.
अनेकजण टर्म लाइफ इन्शुरन्स घेत नाहीत. पण, हा खर्च नसून एक स्मार्ट गुंतवणूक आहे.

वाचा - सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: investment become a millionaire tips learn easy ways to save and invest money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.