Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 

१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 

देशात फ्लिपकार्ट आणि अमेझ़ॉनला पहिली पसंती दिली जाते. त्यातलेत्यात अमेझॉनवर हवी-नको ती वस्तू मिळते. काही मोठ्या शहरांत त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी दिली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:13 PM2024-09-24T16:13:24+5:302024-09-24T16:13:49+5:30

देशात फ्लिपकार्ट आणि अमेझ़ॉनला पहिली पसंती दिली जाते. त्यातलेत्यात अमेझॉनवर हवी-नको ती वस्तू मिळते. काही मोठ्या शहरांत त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी दिली जाते.

iPhone 16 in 10 minutes! Tata pitched big basket-croma; Flipkart in Shock, factory direct?  | १० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 

१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 

आयफोन १६ ची भारतीय बाजारात एन्ट्री झाली आहे. सध्या या फोनच्या विक्रीवर काही विशिष्ट कंपन्यांचीच मक्तेदारी आहे. कारण या कंपन्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी गुपचूप करार करतात, असा आरोप होत आहे. काही ठराविक फोन फक्त एकाच अॅपवर मिळतात. यामुळे भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने तसे आरोप केलेले आहेत. अशातच टाटाही आयफोन १६ विकण्याच्या स्पर्धेत उडी घेत आहे. 

१० मिनिटांत आयफोन १६ ची डिलिव्हरी करण्याची जाहिरात टाटाची कंपनी करू लागली आहे. यामुळे फ्लिपकार्ट, अमेझॉनसारख्या ई कॉमर्स कंपन्यांची तंतरली आहे. टाटाच्या बिग बास्केटने १० मिनिटांत आयफोन १६ देण्याची ऑफर सुरु केली आहे. देशात फ्लिपकार्ट आणि अमेझ़ॉनला पहिली पसंती दिली जाते. त्यातलेत्यात अमेझॉनवर हवी-नको ती वस्तू मिळते. काही मोठ्या शहरांत त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी दिली जाते. परंतू, टाटा १०व्या मिनिटाला आयफोन १६ आणून देणार आहे.

आयफोन १६ तुम्ही या लिंकवरून थेट खरेदी करू शकता... इथे क्लिक करा...

आयफोनच्या खरेदीला दिल्ली, मुंबईत तुफान गर्दी झाली होती. ज्याला त्याला आयफोन १६ हवा होता. एकाने तर स्वत:ला, बायकोला, बहीणीला, भावाला असे चार-पाच आयफोन खरेदी केले होते. या आय़फोन १६ च्या सिरीजची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरु होत आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनचे दिवाळीपूर्वीचे बिग बिलिअन डे सारखे सेल येत आहेत. या सेलमध्ये विविध कार्ड ऑफर्स, एक्स्चेंज ऑफर्सही आहेत. यामुळे हे फोन स्वस्त पडणार आहेत. 

बिग बास्केटने क्रोमासोबत हातमिळवणी केली आहे. या दोन्ही कंपन्या टाटाच्याच आहेत. २० सप्टेंबरलाच ही सर्व्हिस चालू झाली असून मुंबई, दिल्ली, बंगळुरुत सुरुवातीला ही सेवा लाँच करण्यात आली आहे. या १० मिनिटांच्या डिलिव्हरीवर ऑफर काय दिली जाणार आहे हे मात्र टाटाने अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे एकतर १० मिनिटे किंवा एक दिवस वाट पाहून काही हजारांची सूट याची निवड ग्राहकांना करावी लागणार आहे. 

फ्लिपकार्टवरून आयफोन १६ खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Web Title: iPhone 16 in 10 minutes! Tata pitched big basket-croma; Flipkart in Shock, factory direct? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.