मुंबई: आताच्या घडीला शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू असून, अनेकविध कंपन्या IPO सादर करीत आहेत. कोरोना संकाटाच्या काळात अनेक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय बंद पडले असले, तरी काही क्षेत्रातील कंपन्यांची धडाक्यात नफावसुली झाली. अनेक कंपन्यांनी सर्वोत्तम रिटर्न्स दिले. ऑगस्ट महिन्यात काही कंपन्यांचे IPO सादर झाल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी दोन कंपन्यांचे IPO सादर होत आहेत. (ipo of vijaya diagnostic center and amy organics come to target to raise rs 2465 crore)
याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १० हजारांच्या SIP चे झाले १.०८ कोटी; ‘या’ फंडाची दमदार कामगिरी
दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठ्या समग्र डायग्नॉस्टिक्स (निदान) साखळी असणाऱ्या विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर लिमिटेड कंपनीने समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. या योजनेत प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १ सप्टेंबर २०२१ पासून खुली होणार असून ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. यातून १८९५.०४ कोटींचा निधी उभारला जाणार आहे.
भन्नाट! Jio नंतर आता Google करणार Airtel मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक; करार पूर्ण?
कितीची बोली लावता येणार?
महसुलावरून सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डायग्नॉस्टिक्स साखळी पैकी एक विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर लिमिटेड कंपनी आहे. या योजनेचा प्रत्येक समभागासाठीचा किंमतपट्टा ५२२ रुपये ते ५३१ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान २८ समभागांसाठी आणि त्यानंतर २८ च्या पटीत अर्ज करता येणार आहे. ही ऑफर शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१ रोजी बंद होईल. या योजनेत ३५,६८८,०६४ पर्यंतचे इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख
दरम्यान, केमिकल क्षेत्रातील एमी ऑग्रेनिक्स कंपनीचा IPO ही शेअर मार्केटमध्ये १ सप्टेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून कंपनीने २०० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी ६०३ ते ६१० रुपये प्रति शेअरचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.