नवी दिल्लीः प्राप्तिकर विभागानं बँक आणि पोस्टात नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या माध्यमातून इनकम टॅक्स रिटर्न (ITR) न भरणाऱ्यांनी २० लाखांपेक्षा जास्त पैसे काढल्यास आणि इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांनी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढल्यास त्यावरच्या टीडीएस रेटचीही माहिती मिळणार आहे.
या सुविधेची माहिती देताना केंद्रीय कर बोर्डा (सीबीडीटी)ने सांगितले की, आता बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये टीडीएस दर माहिती करून घ्यायचा असल्यास संबंधित व्यक्तीला पॅन नंबर द्यावा लागणार आहे. जो रोख रक्कम काढणार आहे. आतापर्यंत या सुविधेंतर्गत 53,000 पेक्षा अधिक प्रकरणांची पडताळणी करून विनंती पूर्ण करण्यात आली आहेत. सरकारने रोकड व्यवहारांना रोखण्यासाठी बँकांकडून किंवा टपाल कार्यालयांतून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी दोन टक्के दराने टीडीएस लावण्याची व्यवस्था केली आहे, यात काही अपवाद आहेत.
Improving tax compliance, curbing black money, moving towards less-cash economy
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 12, 2020
Thanks to a web service enabled automated facility provided by CBDT, banks and post offices can now ascertain TDS rates on cash withdrawals based only on PAN 👍
📗https://t.co/SyWod2DUlUpic.twitter.com/fXmryUntdH
रोख रक्कम काढण्यावरील नवीन टीडीएस 1 जुलैपासून लागू झाला आहे. परंतु त्याची गणना 2020-21 वर्षांअंतर्गत 1 एप्रिल 2020पासून होणार आहे. डिजिटल व्यवहारास जास्तीत जास्त प्रोत्साहित केले जावे हा सरकारचा प्रयत्न आहे. डिजिटल व्यवहारामुळे पारदर्शकता वाढते आणि काळा पैसा आणि कर चोरी रोखली जाते. रोख व्यवहारानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला चालना मिळते. त्यामुळे सरकारने रोकड व्यवहाराचे नियम कठोर केले आहेत. टीडीएस हा प्राप्तिकराचा एक भाग आहे. यासाठी सरकार उत्पन्नाच्या स्त्रोतावरील कर वजा करते. कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारा पगार, व्याज किंवा कमिशनवर टीडीएस वजा केला जातो.
हेही वाचा
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन
रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख
टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर
CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार
भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला
...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'