Stock Advise Jefferies : गेल्या दोन महिन्यांपासून शेअर बाजारात करेक्शन पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये बाजारात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, दिग्गज ब्रोकरेज फर्म जेफरीजने ५ शेअर्सवर कव्हरेज सुरू केले असून गुंतवणूकदारांना खरेदीकरण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये रिकव्हरीची मोठी अपेक्षा आहे. त्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सारख्यांचा समावेश असून त्यांचं मूल्यांकन ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या खाली आहे.
Coal India - शेअरहोल्डर्सना भरघोस लाभांश देणारी सरकारी कंपनी कोल इंडियाचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून २५ टक्क्यांच्या खाली व्यवहार करत आहे. त्याची सध्याची बाजारातील किंमत ४१० रुपये आहे. त्यासाठी ब्रोकरेज कंपनीनं ५७० रुपयांचे टार्गेट प्राइस दिलं आहे.
HAL - पीएसयू डिफेन्स स्टॉक हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) सध्याची किंमत ४०८७ आहे, जी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून २८ टक्क्यांनी कमी आहे. याची टार्गेट प्राइस ५,७२५ रुपये आहे.
Indigo - देशातील बजेट एअरलाइन कंपनी इंडिगोच्या शेअरची सध्याची किंमत ३८९० रुपये आहे. जो आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा २३ टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे. याचं टार्गेट प्राइस ५,१०० रुपये आहे.
Godrej Consumer Products - गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची सध्याची किंमत ११७५ रुपये आहे, जी आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. त्यात १७ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.
PNB - सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची सध्याची किंमत ९९ रुपये आहे, जी उच्चांकी स्तरापेक्षा ३१ टक्क्यांनी कमी आहे. याची टार्गेट प्राइस १३५ रुपये निश्चित करण्यात आलीये.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)