Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?

Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?

रिलायन्स जिओच्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ दररोजच्या १० रुपयांमध्ये २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:27 PM2024-09-30T16:27:14+5:302024-09-30T16:27:35+5:30

रिलायन्स जिओच्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ दररोजच्या १० रुपयांमध्ये २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

Jio New Recharge Plan Get 2 GB data unlimited calling also for Rs 10 per day What is the plan 999 rs plan details | Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?

Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?

Jio New Recharge Plan : जुलै महिन्यात जिओ, एअरटेल, व्हीआय सारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती तब्बल १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली होती. दरम्यान, लोकांचं लक्ष बीएसएनएलकडे वळलं आहे, कारण बीएसएनएल आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत खूप चांगले प्लॅन ऑफर करत आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ वेळोवेळी काही ना काही रिचार्ज प्लॅन आणत असते. दरम्यान, रिलायन्स जिओच्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ दररोजच्या १० रुपयांमध्ये २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन ९८ दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर रिचार्ज जवळपास 3 महिन्यांसाठी डिस्चार्ज होईल. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ९८ दिवसांसाठी दररोज १० रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ५जी इंटरनेट सेवेचा लाभ मिळणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये मिळेल. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमा सारख्या जिओ अॅप्सचाही या प्लॅनमध्ये समावेश आहे.

जर तुम्ही स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर जिओचा २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील तुमच्यासाठी बेस्ट असेल. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच दररोज १ जीबी डेटाही मिळणार आहे. याशिवाय दररोज १०० एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या रिचार्जमध्ये तुम्ही जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमाच्या अॅक्सेसचा ही लाभ घेऊ शकता.

Web Title: Jio New Recharge Plan Get 2 GB data unlimited calling also for Rs 10 per day What is the plan 999 rs plan details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.