Lokmat Money > बिझनेस न्यूज > KRN Heat Exchanger IPO Listing: IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

KRN Heat Exchanger IPO Listing: IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

KRN Heat Exchanger IPO Listing: कंपनीच्या शेअर्सची आज शेअर बाजारात दमदार लिस्टिंग झाली. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ११४ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४७० रुपयांवर लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:39 AM2024-10-03T11:39:44+5:302024-10-03T11:41:28+5:30

KRN Heat Exchanger IPO Listing: कंपनीच्या शेअर्सची आज शेअर बाजारात दमदार लिस्टिंग झाली. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ११४ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४७० रुपयांवर लिस्ट झाले.

KRN Heat Exchanger IPO Listing money double first day Now investors rush to buy stocks know share price | KRN Heat Exchanger IPO Listing: IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

KRN Heat Exchanger IPO Listing: IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

KRN Heat Exchanger IPO Listing: केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ११४ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४७० रुपयांवर लिस्ट झाले. तर एनएसईवर हे शेअर्स ११८ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४८० रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये लिस्टिंग झाल्यानंतरही जोरदार तेजी पाहायला मिळाली. 
बीएसईवर या शेअरने पहिल्या दिवशी १२५ टक्क्यांची वाढ नोंदवत ४९७ रुपयांचा उच्चांक गाठला. एकीकडे शेअर बाजारात घसरण दिसत असली तरी या आयपीओच्या दमदार लिस्टिंगमुळे पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 

२५ सप्टेंबरला उघडलेला आयपीओ

केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेडचा आयपीओ (KRN Heat Exchanger IPO) २५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २७ सप्टेंबर रोजी बंद झाला. केआरएन हीट एक्स्चेंजर आणि रेफ्रिजरेशन आयपीओ तीन दिवसांत २१३.२६ पट सब्सक्राइब झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत १,०९,९३,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत २,३४,४३,३८,२३० शेअर्ससाठी बोली लागली होती. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ४३०.३९ पट, तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा (क्यूआयबी) २५३.०४ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा (आरआयआय) हिस्सा ९६.५० पट सबस्क्राइब झाला होता.

कंपनीची योजना काय?

सुमारे २४२.५ कोटी रुपयांची रक्कम केआरएन एचव्हीएसी प्रॉडक्ट्स या पूर्ण मालकीच्या उपकंपनीत गुंतवणुकीसाठी राजस्थानमधील अलवरमधील निमराणा येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी वापरली जाईल. याशिवाय उर्वरित रक्कम सामान्य हेतूंसाठी वापरली जाणार आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: KRN Heat Exchanger IPO Listing money double first day Now investors rush to buy stocks know share price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.