Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या

LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या

या खरेदीमुळे एलआयसीचा बँकेतील एकूण हिस्सा ३६,४७,५८,६७८ शेअर्स म्हणजेच ७.०५३ टक्के हिस्सा इतका होईल. दरम्यान, आजच्या व्यवहारात बँकेचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून २४९.३९ रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:29 IST2025-04-21T16:24:02+5:302025-04-21T16:29:33+5:30

या खरेदीमुळे एलआयसीचा बँकेतील एकूण हिस्सा ३६,४७,५८,६७८ शेअर्स म्हणजेच ७.०५३ टक्के हिस्सा इतका होईल. दरम्यान, आजच्या व्यवहारात बँकेचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून २४९.३९ रुपयांवर पोहोचला.

LIC buys 10 45 crore shares of bank of baroda price less than rs 250 Now investors buying stocks | LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या

LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या

विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीनं सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) मधील आपला हिस्सा सुमारे दोन टक्क्यांनी वाढवून ७.०५ टक्के केला आहे. सोमवारी एलआयसीनं यासंदर्भातील माहिती दिली. एलआयसीनं (LIC) शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत, त्यांनी दीड वर्षांच्या कालावधीत खुल्या बाजारातून १०.४५ कोटी अतिरिक्त शेअर्स खरेदी केले असल्याचं सांगितलंय.

बँक ऑफ बडोदानं १९ एप्रिल रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, एलआयसीनं २० नोव्हेंबर २०२३ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत बाजार खरेदीद्वारे १०,४५,४१,४०३ शेअर्स खरेदी केल्याचं सांगितलं. हा २.०२२ टक्के हिस्सा आहे. या खरेदीमुळे एलआयसीचा बँकेतील एकूण हिस्सा ३६,४७,५८,६७८ शेअर्स म्हणजेच ७.०५३ टक्के हिस्सा इतका होईल. दरम्यान, आजच्या व्यवहारात बँकेचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून २४९.३९ रुपयांवर पोहोचला.

कसा आहे शेअरहोल्डिंग पॅटर्न?

बीएसईवर उपलब्ध असलेल्या मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीअखेर म्युच्युअल फंडांकडे बँक ऑफ बडोदामध्ये एकूण ४७,४१,१७,३३६ शेअर्स किंवा ९.१७ टक्के हिस्सा होता. एसबीआय लार्ज अँड मिड कॅप फंड, कोटक इक्विटी आर्बिट्राज फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी एस अँड पी बीएसई ५०० ईटीएफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी फंड या प्रमुख फंड योजनांकडे बँक ऑफ बडोदाचे शेअर्स आहेत. इक्विटी कंपन्यांकडे ३८,८८,५९,३५९ शेअर्स म्हणजेच ७.५२ टक्के हिस्सा होता, तर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे ४६,४१,५६,३८९ शेअर्स होते, जे ८.९८ टक्के होतं.

बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सची स्थिती काय?

बँक ऑफ बडोदाच्या शेअरनं गेल्या वर्षभरात खराब कामगिरी केली असून जवळपास ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. पीएसयू बँकेचा शेअर नुकताच ४ मार्च रोजी १९०.७० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या वर्षी ३ जून रोजी २९८.४५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, यावर्षी मार्चपासून या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मासिक पातळीवर हा शेअर मार्चमध्ये १६ टक्क्यांनी वधारल्यानंतर एप्रिलमध्ये आतापर्यंत जवळपास ९ टक्क्यांनी वधारला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: LIC buys 10 45 crore shares of bank of baroda price less than rs 250 Now investors buying stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.