Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 

तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 

Aadhaar Card News : अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची गरज भासते. अशातच तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबरही लक्षात नसेल तर मोठी समस्या येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:39 AM2024-11-22T11:39:54+5:302024-11-22T11:39:54+5:30

Aadhaar Card News : अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची गरज भासते. अशातच तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबरही लक्षात नसेल तर मोठी समस्या येऊ शकते.

Lost your Aadhaar card dont remember the number What to do know step by step procedure | तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 

तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 

Aadhaar Card News : आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची गरज भासते. अशातच तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबरही लक्षात नसेल तर मोठी समस्या येऊ शकते.

यूआयडीएआयच्या नियमांनुसार आधार कार्डसाठी केवळ एकदाच अर्ज करता येतो. मात्र, आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. आधारमध्ये तुम्ही तुमचे नाव, पत्ता आणि जन्मतारीख इत्यादी बदलू शकता. तसंच आधार हरवल्यास किंवा खराब झाल्यास ते रिक्रिएट करण्याची सुविधाही दिली जाते, पण नवीन आधार कार्डही जुन्याच नंबरनं तयार केलं जातं. नवीन क्रमांकासह नवीन आधार तयार करण्याचा कोणताही नियम नाही.

पण समजा जर तुमचं आधार कार्ड कुठेतरी हरवलं असेल आणि तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांकही आठवत नसेल. मग तुमच्याकडे काय उपाय आहे? स्वत:साठी नवीन कार्ड कसं बनवणार? याबद्दल आज जाणून घेऊया.

असं बनवाल आधार कार्ड

आधार कार्ड बनवताना नागरिकांच्या बोटांचे ठसे आणि आयरिस स्कॅन केले जातात. तसंच अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीही रजिस्टर केला जातो. अशा परिस्थितीत जर आधार कार्ड हरवलं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून तुमच्या आधारचा नंबर शोधू शकता आणि त्याच नंबरसह नवीन आधार कार्ड बनवू शकता.

या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

  • यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये जाऊन रिकव्हर लॉस्ट किंवा फॉरगॉटन ईआयडी/यूआयडी या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर येथे मागितलेली सर्व माहिती एन्टर करा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • ओटीपी एन्टर करा आणि लॉगइन बटणावर क्लिक करा.
  • पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
  • यानंतर तुम्ही नवीन आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.
  • आपण इच्छित असल्यास आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊनदेखील हे काम करून घेऊ शकता.


आधार नंबर कसा माहित कराल?

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबरही आठवत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही टोल फ्री नंबरचीही मदत घेऊ शकता. १९४७ या टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकता. आयव्हीआर पर्यायांचा वापर करून बेस एक्झिक्युटिव्हशी बोलण्याचा पर्याय निवडा. या दरम्यान, एक्झिक्युटिव्ह आपल्याला काही प्रश्न विचारेल. याचं योग्य उत्तर द्यावं लागेल. यानंतर तुमच्या आधारचा तपशील तुम्हाला पाठवला जाईल. आपण त्यांना डुप्लिकेट आधार कार्डसाठी विनंती देखील करू शकता, याव्यतिरिक्त आपण यूआयडीएआय पोर्टलवर जाऊन डुप्लिकेट आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.

Web Title: Lost your Aadhaar card dont remember the number What to do know step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.