Join us  

LPG Price Reduced : महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, LPG सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या, नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 7:55 AM

LPG Price Reduced : एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आला असून तो स्वस्त झाला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आला असून तो स्वस्त झाला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० ते ३१ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना स्वस्त सिलिंडर मिळणार आहेत. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला असून तो १६४६ रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत १६७६ रुपये प्रति सिलिंडर होती. कोलकातामध्ये सिलिंडर ३१ रुपयांनी स्वस्त झाला असून तो १७५६ रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत १७८७ रुपये होती.

मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो १५९८ रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलिंडर १६२९ रुपये होती. तसेच चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो १८०९.५० रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत १८४०.५० रुपये प्रति सिलिंडर होती.

बिहारची राजधानी पाटणामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९१५.५ रुपयांवर आली आहे. त्याचवेळी गुजरातमधील अहमदाबादमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १६६५ रुपये झाला आहे.

घरगुती १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे.कोलकाता येथे घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे.मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८१८.५० रुपयांना उपलब्ध आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय