Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले

Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले

Stock Market Boom : महाराष्ट्रात महायुतीच्या 'महा'विजयाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:47 AM2024-11-25T09:47:43+5:302024-11-25T09:47:43+5:30

Stock Market Boom : महाराष्ट्रात महायुतीच्या 'महा'विजयाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.

 maha victory of the Mahayuti bjp shiv sena alliance in the state is a joy in the stock market Sensex Nifty is up Adani shares rose | Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले

Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले

Stock Market Boom : महाराष्ट्रात महायुतीच्या 'महा'विजयाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्सनं ८०००० ची पातळी ओलांडून व्यवहाराला सुरुवात केली आणि मागील बंद ७९,११७.११ वरून जोरदार उसळी घेतली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीनंदेखील मोठ्या तेजीसह व्यवहाराला सुरूवात केली. दरम्यान, सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. बीएसई सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारून ८०००० च्या वर उघडला आणि काही मिनिटांतच ८०,४०७ चा आकडा गाठला, तर एनएसई निफ्टीनंही ३७० अंकांच्या वाढीसह व्यवहार सुरू केला आणि १४,२८० च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. बाजारात आधीच तेजीची चिन्हे दिसू लागली होती, प्री-ओपन सेशनमध्येच सेन्सेक्स ९०० अंकांपेक्षा जास्त उसळी घेऊन व्यवहार करताना दिसला आणि जेव्हा बाजार उघडला तेव्हाही अशीच तेजी दिसून आली. याशिवाय आशियाई बाजारांमध्ये मोठी तेजी दिसून आली.

अदानींचे शेअर्स वधारले

गेल्या आठवड्यात भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सना अमेरिकेच्या न्याय विभाग आणि एसईसीच्या लाचखोरीच्या आरोपांचा मोठा फटका बसला होता. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि शेअर बाजारात लिस्टेड सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये वादळी तेजी पाहायला मिळाली. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २.१२ टक्क्यांनी वधारून २,२७६.८५ रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर ४.७१ टक्क्यांनी वधारून ६७९.५० रुपयांवर व्यवहार करत होता.

अदानी पोर्ट्स (२.२५%), अदानी टोटल गॅस शेअर (२.११%), अदानी पॉवर शेअर (१.२५%), अदानी ग्रीन एनर्जी शेअर (२.६७%), अदानी विल्मर (१.२७%), एसीसी लिमिटेड शेअर (१.४०%), अंबुजा सिमेंट्स शेअर (१.००%) आणि एनडीटीव्हीचा शेअर (०.३७%) वधारला.

शुक्रवारीही मोठी तेजी

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई शेअर बाजाराचा (सेन्सेक्स) ३० शेअर्सचा सेन्सेक्स २००० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे ६०० अंकांनी वधारला. बाजारातील व्यवहार संपेपर्यंत हा वेग काहीसा मंदावला होता, पण असं असूनही बीएसई सेन्सेक्स १९६१.३२ अंकांच्या म्हणजेच २.५४ टक्क्यांच्या वाढीसह ७९,११७.११ च्या पातळीवर बंद झाला. तर एनएसईनिफ्टी निर्देशांक ५५७.३५ अंकांनी म्हणजेच २.३९ टक्क्यांच्या वाढीसह २३,९०७.२५ वर बंद झाला.

Web Title:  maha victory of the Mahayuti bjp shiv sena alliance in the state is a joy in the stock market Sensex Nifty is up Adani shares rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.