Join us  

Maharashtra Interim Budget 2024 Live: राज्य सरकारचा दिलासा, सर्व कृषी पंपांची थकित वीजबिलं माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:39 PM

Ajit Pawar Announced Maharashtra Interim Budget 2024 Live: महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत, ...

28 Jun, 24 03:04 PM

पेट्रोल डिझेलवरील मूल्य़वर्धित करात कपातीचा प्रस्ताव

राज्यातील मूल्यवर्धित करात समानता आणण्याची आवश्यकता होती आणि आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या क्षेत्रातील डिझेलवरील कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के करण्याचं प्रस्तावित आहे. पेट्रोलवरील २६ टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील पेट्रोलचा दर ६५ पैसे आणि डिझेलचा दर २.०७ रुपये स्वस्त होणार.

28 Jun, 24 02:55 PM

शेती कृषी पंपांचे थकित वीजबिल माफ

राज्यातील ४६ लाख ६ हजार शेती पंप धारक, एवढे शेतकरी साडेसात हॉर्सपावर पर्यंत मोटार चालवतात. त्यावरही आणखी काही शेतकरी आहेत. त्यांचा वीज माफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

28 Jun, 24 02:48 PM

तृतीयपंथींचा शासकीय भरतीत समावेश करणार

तृतीयपंथींना शासकीय योजनेचा लाभ मिळणार. शासकीय भरतीत समावेश करणार. दिव्यांगांसाठीही विविध योजना राबवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

28 Jun, 24 02:45 PM

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार.

28 Jun, 24 02:41 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारणार. लघु वस्त्रोद्योग संकुलही उभारणार. बुलढाण्यात नवं आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय उभारणार.

28 Jun, 24 02:40 PM

नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार

राज्यात सध्या १ लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर्स आहेत. २०३५ पर्यंत १ लाख लोकसंख्ये मागे १०० हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय मगाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता. जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथचा समावेश.

28 Jun, 24 02:36 PM

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर. दरवर्षी १० लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देणार. दरवर्षी १० हजार रुपयांचा 

28 Jun, 24 02:31 PM

शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार

उपसा सिंचन योजनेचं सौर्यऊर्जीकरण करणार. यासाठी ४००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार. जलयुक्त शिवारसाठी ६५० कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार.

28 Jun, 24 02:25 PM

गाय दूध उत्पादकांना जुलैपासून ५ रुपयांचं अनुदान सुरू राहाणार

गाय दूध उत्पादकांना जुलैपासून ५ रुपयांचं अनुदान सुरू राहाणार. शेळी, मेंढी, कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योना राबवणार

28 Jun, 24 02:22 PM

कापूस, सोयाबीन,  शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपयांचं सहाय्य

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई पंचनामा प्रमाली संपूर्ण राज्यात लागू. शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम करणार. गाव तिथे गोदाव योजना राबवण्यात येणार आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कापूस, सोयाबीन,  शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपयांचं सहाय्य

28 Jun, 24 02:19 PM

इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ

राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध. अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत ८ लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ. या निर्णयाचा लाभ २ लाख ५ हजार मुलींना होणार. २०२४-२५ पासून योजना सुरू.

28 Jun, 24 02:15 PM

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. पात्र कुटुंबाना वर्षाला ३ मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

28 Jun, 24 02:14 PM

विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला

विवाहित मुलींसाठीच्या विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. या अंतर्गत १० हजारांऐवजी २० हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

28 Jun, 24 02:11 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार

राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक योजनेची सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार. महिलांसाठी विविध योजना सुरु केल्या जाणार. योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षांतील महिलांना दरमहा १५०० रुपये देमार. 

28 Jun, 24 02:07 PM

मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापणार

संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अर्थसंकल्पाची सुरुवात. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

28 Jun, 24 02:07 PM

प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी

प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे.

28 Jun, 24 02:05 PM

मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापणार

संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अर्थसंकल्पाची सुरुवात. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

28 Jun, 24 02:03 PM

अजित पवारांकडून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात

श्री संत तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांकडून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात.

28 Jun, 24 01:34 PM

स्टार्टअप्समध्येही महाराष्ट्र अग्रेसर

मार्च २०२४पर्यंत अखिल भारतीय स्तरावर केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा १९ टक्के इतका आहे.

28 Jun, 24 01:28 PM

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यासह विविध राज्यांशी स्पर्धा असूनही २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम ठेवले असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीतून समोर आले आहे.

28 Jun, 24 01:21 PM

२०२३-२४ च्या वार्षिक योजनांसाठी एकूण अपेक्षित खर्च

  • २०२३-२४ च्या वार्षिक योजनांसाठी एकूण अपेक्षित खर्च - २ लाख ३१ हजार ६५१ कोटी रुपये 
  • जिल्हा वार्षिक योजनांवरील खर्च - २९ हजार १८८ कोटी रुपये

28 Jun, 24 12:58 PM

व्याजाची रक्कम १५ टक्क्यांनी वाढली

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून कर्जाबाबतची माहिती समोर आली आहे. कर्ज वाढल्याने व्याजाची रक्कमही वाढली असून, गेल्या वर्षीच्या ४१ हजार ६८९ कोटी रुपयांच्या तुलनेत ती १५.५२ टक्क्यांनी वाढून ४८ हजार ५७८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.  

28 Jun, 24 12:49 PM

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला

राज्यावरील कर्जाचा बोजा २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १३ टक्क्यांची आहे.

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024अजित पवारदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेविधानसभा