Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री, खासगीकरण, चलनीकरण यानंतर आता मोदी सरकार सरकारी जमिनी, मालमत्ता यांची विक्री करणार असल्याची माहिती मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:19 AM2021-09-28T09:19:08+5:302021-09-28T09:22:58+5:30

सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री, खासगीकरण, चलनीकरण यानंतर आता मोदी सरकार सरकारी जमिनी, मालमत्ता यांची विक्री करणार असल्याची माहिती मिळत आहे.

for monetisation push modi govt to set up national land monetisation corporation soon | मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्गुंतवणुकीची योजना जाहीर केली होती. यानुसार, अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करणे, यासह काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा समावेश होता. यानंतर केंद्रातील मोदी सरकारने चलनीकरण धोरण जाहीर केले. सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री, खासगीकरण, चलनीकरण यानंतर आता मोदी सरकार सरकारी जमिनी, मालमत्ता यांची विक्री करून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी एका विशेष कंपनीची स्थापनाही करण्यात येणार आहे. (for monetisation push modi govt to set up national land monetisation corporation soon)

इंधनदरवाढ सुरूच! सलग ४ दिवस डिझेल महागले, पेट्रोलचा भावही वधारला; जाणून घ्या, नवे दर

केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमधील जमिनी, मालमत्ता तसेच नॉन कोअर संपत्ती विकण्याचा किंवा त्याचे चलनीकरण करण्याचा विचार केंद्र सरकार करत असून, ही प्रक्रिया जलदगतीने पार पडावी, यासाठी एका विशेष कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. नॅशनल लँड मॉनिटायझेशन कॉर्पोरेशन असे याचे नाव असणार आहे. हे कॉर्पोरेशन पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असेल. तसेच या कंपनीकडे १५० कोटी रुपयांचे शेअर कॅपिटलही असेल, असे सांगितले जात आहे. 

HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

३५०० एकर जमीन निश्चित!

नॅशनल लँड मॉनिटायझेशन कॉर्पोरेशनमध्ये संबंधित मंत्रालयांचे सचिव आणि रियल इस्टेट सेक्टर, गुंतवणूकदार बँका यांच्या प्रतिनिधींचा यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच या अंतर्गत एक बोर्ड स्थापन करण्यात येणार असून, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने विविध कंपन्यांची सुमारे ३५०० एकर जमिनीची विक्रीसाठी किंवा चलनीकरणासाठी पाहणी केली असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सदर जमीन, मालमत्ता सदर कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केले जाईल आणि या माध्यमातून याची विक्री किंवा चलनीकरण केले जाईल, असे सांगितले जात आहे. सदर कॉर्पोरेशन जमीन किंवा मालमत्तांच्या विक्री किंवा चलनीकरणाबाबत सरकारला सल्ला देईल, असे म्हटले जात आहे. 

LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

दरम्यान,  चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये खाजगीकरणातून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य आहे. एअर इंडियाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू आहे. यासाठी आतापर्यंत दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. भारत पेट्रोलियम आणि एलआयसी देखील सूचीबद्ध केले जाणार आहेत. मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत LIC चा IPO येऊ शकेल. तसेच Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: for monetisation push modi govt to set up national land monetisation corporation soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.