BluSmart Wallet Refund Process: इलेक्ट्रिक कॅब सेवा ब्लूस्मार्टने दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईमध्ये अचानक त्यांची सेवा बंद केली आहे. या निर्णयानंतर लाखो वापरकर्ते नाराज झाला आहेत. कारण, ब्लूस्मार्ट कंपनीच्या वॉलेटमध्ये अनेकांचे पैसे अडकले आहेत. कॅब सेवा बंद असल्याने, अॅप देखील काम करत नाही. कंपनीने सर्व प्रकारची बुकिंग थांबवली आहे. या मोठ्या निर्णयामुळे ग्राहकांनाच त्रास होत नाहीये तर कॅब चालकांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. तुमचेही वॉलेटमध्ये पैसे अडकले असतील तर काळजी करू नका. आम्ही रिफंड मिळवण्याची प्रक्रिया सांगणार आहोत, तुम्ही फोलो करा.
ब्लूस्मार्टने दिली ९० दिवसांची वेळ
जर ९० दिवसांच्या आत सेवा सुरू झाल्या नाहीत तर परतफेड प्रक्रिया सुरू होईल, असे ब्लूस्मार्टने म्हटले आहे. परंतु, वापरकर्त्यांना वॉलेटमध्ये अडकलेले पैसे परत मिळविण्यात अडचणी येत आहेत. ब्लूस्मार्टचे सह-संस्थापक अनमोल आणि पुनीत जग्गी यांच्याविरुद्ध सेबीने सुरू असलेल्या कारवाईमुळे हे सर्व घडले आहे. दोन्ही संस्थापकांवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी मिळालेल्या निधीचा वापर वैयक्तिक वापरासाठी केल्याचा आरोप आहे.
रिफंड मिळणार का?
कंपनीच्या धोरणानुसार, वॉलेटमधील पैसे नॉन रिफंडेबल आहेत. पण, या प्रकरणात, कायदेशीर तज्ञांचे म्हणणे आहे की डिजिटल वॉलेट ही वापरकर्त्यांची मालमत्ता आहे. कंपनी त्यावर मनमानीपणे निर्बंध लादू शकत नाही. कंपनीने वापरकर्त्यांना एक ईमेल पाठवला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की जर कंपनीने ९० दिवसांच्या आत पुन्हा सेवा सुरू केली नाही तर वापरकर्त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.
वाचा - ५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
परतफेड मिळविण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा
- सर्वप्रथम ब्लू स्मार्ट अॅप उघडा आणि वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनू आयकॉनवर क्लिक करा. तिथे हेल्प पर्यायावर क्लिक करा.
- आता ब्लू वॉलेट पर्याय निवडा. यानंतर, वॉलेट आणि रिफंडशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न दिसू लागतील. यामध्ये थेट लिंक नसेल. तुम्हाला सपोर्टशी संपर्क साधावा लागेल.
- टीमशी संपर्क साधण्याचा पर्याय उघडताच, तुमच्या वॉलेट बॅलन्सची परतफेड मागा.