Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिसेंबर महिन्यात देशभरात सर्वच दुचाकींच्या विक्रीमध्ये झाली मोठी घट

डिसेंबर महिन्यात देशभरात सर्वच दुचाकींच्या विक्रीमध्ये झाली मोठी घट

आघाडीच्या सगळ्याच कंपन्यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:42 AM2020-01-04T02:42:51+5:302020-01-04T06:51:34+5:30

आघाडीच्या सगळ्याच कंपन्यांना बसला फटका

In the month of December, there was a big drop in the sales of all the bikes in the country | डिसेंबर महिन्यात देशभरात सर्वच दुचाकींच्या विक्रीमध्ये झाली मोठी घट

डिसेंबर महिन्यात देशभरात सर्वच दुचाकींच्या विक्रीमध्ये झाली मोठी घट

नवी दिल्ली : देशातील बहुतेक सर्व दुचाकी उत्पादकांची विक्री डिसेंबर, २०१९ या महिन्यात प्रचंड घटली आहे, असे दुचाकी क्षेत्रातील विक्रेत्यांनी म्हटले आहे. हिरो बाइक व प्लेझर स्कूटर तयार डिसेंबरमध्ये ४,१२,००९ दुचाकी विकल्या गेल्या. डिसेंबर, २०१८ मध्ये या प्रकारच्या ४,३६,५९१ दुचाकी विकल्या होत्या.

प्लॅटिना, पल्सर, अ‍ॅव्हेंजर, डॉमिनर डिसेंबर, २०१९ मध्ये १,२४,१२५ विकल्या गेल्या डिसेंबर, २०१८ मध्ये १,५७,२५२ दुचाकी विकल्या होत्या. स्कूटीच्या विविध मॉडेल्सची विक्री डिसेंबरमध्ये २५ टक्क्यांनी घटली. डिसेंबर, २०१८ मध्ये २,०९,९०६ स्कूटर्स विकल्या होत्या. डिसेंबर, २०१९ १,५७,२४४ स्कूटर्स विकल्या गेल्या. बुलेटची विक्रीही डिसेंबर, २०१८ मध्ये ५०,०२६ वरून डिसेंबर, २०१९ मध्ये ४८,४८९वर आली. मात्र, सुझुकी बाइक व स्कूटरच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यांची विक्री डिसेंबर, २०१८ मध्ये ४३,८७४ होती. डिसेंबर, २०१९ मध्ये विक्री ४४,३६८ झाली आहे.

डिसेंबर-१९ मध्ये दुचाकींची विक्री
कंपनी                                    डिसें-१८       डिसें-१९     घट/वाढ
हिरो मोटोकॉर्प                     ४,३६,५९१     ४,१२,००९   - ५.६०%
बजाज ऑटो                        १,५७,२५२     १,२४,१२५      - २१%
टीव्हीएस मोटर्स                   २,०९,९०६     १,५७,२४४     - २५%
रॉयल एन्फिल्ड                      ५६,०२६        ४८,४८९       - १३%
सुझुकी मोटर सायकल्स        ४३,८७४        ४४,३६८      + १.१०%

Web Title: In the month of December, there was a big drop in the sales of all the bikes in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.