Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

Hurun Global Rich List 2025 च्या रिपोर्टनुसार रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे टॉप १० यादीतून बाहेर पडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 21:28 IST2025-03-27T21:26:26+5:302025-03-27T21:28:13+5:30

Hurun Global Rich List 2025 च्या रिपोर्टनुसार रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे टॉप १० यादीतून बाहेर पडले आहेत.

Mukesh Ambani falls in Shrimat list, Roshni Nadar becomes fifth in the list of richest women in the world | मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

 उद्योग जगामध्ये एक मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले. देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे स्थान घसरले आहे. पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीतून ते बाहेर पडले असून, त्याच्या नेटवर्थ मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख कोटींनी घटली आहे. दुसरीकडे एचसीएलच्या रोशनी नाडर यांनी जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!   

Hurun Global Rich List 2025 ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार टेस्लाचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानी कायम आहेत. त्यांची संपत्ती ८२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्याकडे एकूण ४२० बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. 

हेही वाचा >>कोण आहेत रोशनी नाडर, ज्या एका रात्रीत बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेस वुमन

रोशनी नाडर यांच्या संपत्ती वाढ 

आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएलच्या रोशनी नाडर यांनी जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. त्यांच्याजवळ ३.५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. रोशनी नाडर या पहिल्या अशा महिला उद्योजक आहेत, ज्यांनी जगातील टॉप १० श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांचे वडील शिव नाडर यांनी कंपनीतील ४७ हिस्सा रोशनी नाडर यांना दिला आहे. 

भारतातील श्रीमंतांच्या टॉप ५ मध्ये कोण-कोण?

मुकेश अंबानी हे भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची ८.६ लाख कोटींची नेटवर्थ आहे. दुसऱ्या स्थानी गौतम अदानी आहेत. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नेटवर्थमध्ये १३ टक्के वाढ झाली आहे. त्यांची नेटवर्थ ८.४ लाख कोटी इतकी आहे. 

तिसऱ्या स्थानी रोशनी नाडर या आहेत. या यादीत त्यांना पहिल्यांदाच जागा मिळाली आहे.  

सन फार्माचे दिलीप सांघवी यांची संपत्ती २१ टक्क्यांनी वाढली असून, त्यांच्याकडे आता २.५ लाख कोटींची संपत्ती आहे. ते या यादीत चौथ्या स्थानी आहेत. विप्रोचे अजीम प्रेमजी २.२ लाख कोटी रुपये संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत. 

कुमार मंगलम बिर्ला हे २ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर असून, सायरस पूनावाला हे २ लाख कोटी नेटवर्थसह हेही सहाव्या क्रमांकावर आहेत. मागील एक वर्षात त्यांच्या नेटवर्थमध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Web Title: Mukesh Ambani falls in Shrimat list, Roshni Nadar becomes fifth in the list of richest women in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.