Jio Financial Services shares : जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नवी बातमी आल्यानंतर पाहायला मिळाली आहे. एनएसईनं १३ नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी केलं. जिओ फायनान्शिअलसह ४५ कंपन्यांच्या शेअर्सचा फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आलाय. ते २९ नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील.
कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये ३०२.४५ रुपयांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअरने ६ टक्क्यांहून अधिक तेजीसह ३२० रुपयांची पातळी ओलांडली. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३९४.७० रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१५.१० रुपये आहे.
या कंपन्यांचा समावेश
झोमॅटो, डीमार्ट, बीएसई, येस बँक, पेटीएम, एलआयसी, बँक ऑफ इंडिया, अदानी टोटल गॅस, एंजल वन, नायका, केपीआय टेक्नॉलॉजीज, टाटा एलेक्सीसह ४५ कंपन्यांचा समावेश आहे.
आर्थिक स्थिती कशी?
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६८९ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६६८ कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचे उत्पन्न ६९३.५० कोटी रुपये होते.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
सप्टेंबर २०२३ पर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कंपनीत २१.५८ टक्के हिस्सा होता. जो आता १६.८८ टक्क्यांवर आला आहे. जून २०२४ तिमाहीत एफआयआयचा वाटा १७.५५ टक्के होता. मात्र, म्युच्युअल फंडांनी जून तिमाहीच्या तुलनेत आपला हिस्सा वाढवला आहे. सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडाचा एकूण हिस्सा ४.१७ टक्के होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)