Lokmat Money > बिझनेस न्यूज > घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?

घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?

Mutual Funds Top Pics : गेल्या ३ महिन्यांत निफ्टी ५० आणि सेन्सेक्स निर्देशांकांत जवळपास ४.५% घसरण झाली आहे. अशा वातावरणातही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:35 PM2024-11-19T15:35:52+5:302024-11-19T15:35:52+5:30

Mutual Funds Top Pics : गेल्या ३ महिन्यांत निफ्टी ५० आणि सेन्सेक्स निर्देशांकांत जवळपास ४.५% घसरण झाली आहे. अशा वातावरणातही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत

mutual fund investing changing stocks in a falling market know top stocks in 3 months invested | घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?

घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?

Mutual Funds Top Pics : गेल्या ३ महिन्यांत निफ्टी ५० आणि सेन्सेक्स निर्देशांकांत जवळपास ४.५% घसरण झाली आहे. अशा वातावरणातही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत. या 3 महिन्यांत म्युच्युअल फंडांनी बाजारातील निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेजनं म्युच्युअल फंड हाऊसेसनं ३ महिन्यांत खरेदी-विक्री केलेल्या समभागांची नावं असलेली यादी दिली आहे.

लार्जकॅप सेगमेंट

लार्जकॅप सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंड हाऊसेसनं गेल्या तीन महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टीसीएस, आयटीसी आणि एलआयसी सारख्या शेअर्सची खरेदी केली आहे. दुसरीकडे लार्ज कॅप सेगमेंटमध्ये अपोलो हॉस्पिटल्स, ओएफएसएस, सोलर इंडस्ट्रीज, टोरंट पॉवर आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स या सारख्या शेअर्समधून त्यांनी गुंतवणूक कमी केली आहे.

मिड कॅप सेगमेंट

मिडकॅप सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंड हाऊसेसनं एनएलसी इंडिया, पिरामल फार्मा, गॉडफ्रे फिलिप्स, आदित्य बिर्ला फॅशन आणि आयआरबी इन्फ्रा या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक गुंतवणूक केली. तर ब्लू स्टार, एल अँड टी फायनान्स, कायन्स टेक्नॉलॉजीज, सुवेन फार्मा आणि एंड्युरन्स टेक या सारख्या मिडकॅप शेअर्समधून गुंतवणूक कमी केली आहे.

स्मॉलकॅप सेगमेंट

स्मॉल कॅप सेगमेंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या ३ महिन्यांत म्युच्युअल फंड हाऊसेसनं आयएसजीईसी हेवी, अरविंद, टाइम टेक्नोप्लास्ट, एसबीएफसी फायनान्स आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स सारख्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. तर या काळात आयटीडी सिमेंटेशन, सेरा सॅनिटरी, एसएफएल, टेक्समॅको रेल आणि सीएमएस इन्फो सिस्टम्स सारख्या शेअर्समधून त्यांनी गुंतवणूक कमी केलीये.

(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: mutual fund investing changing stocks in a falling market know top stocks in 3 months invested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.