Lokmat Money >म्युच्युअल फंड > ₹१० हजारांच्या SIP नं १० वर्षांत केले ३२ लाख, पाहा कॅलक्युलेशनसह संपूर्ण माहिती

₹१० हजारांच्या SIP नं १० वर्षांत केले ३२ लाख, पाहा कॅलक्युलेशनसह संपूर्ण माहिती

Best Sectoral Funds: ऑगस्ट महिन्याच्या आलेल्या म्युच्युअल फंडाच्या आकडेवारीत इक्विटी श्रेणीतील सर्वाधिक गुंतवणूक सेक्टरल फंडांमध्ये झाल्याची माहिती समोर आली ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:20 PM2023-09-16T17:20:47+5:302023-09-16T17:21:22+5:30

Best Sectoral Funds: ऑगस्ट महिन्याच्या आलेल्या म्युच्युअल फंडाच्या आकडेवारीत इक्विटी श्रेणीतील सर्वाधिक गुंतवणूक सेक्टरल फंडांमध्ये झाल्याची माहिती समोर आली ...

32 lakhs in 10 years with SIP of rs 10000 see complete details with calculations know funds | ₹१० हजारांच्या SIP नं १० वर्षांत केले ३२ लाख, पाहा कॅलक्युलेशनसह संपूर्ण माहिती

₹१० हजारांच्या SIP नं १० वर्षांत केले ३२ लाख, पाहा कॅलक्युलेशनसह संपूर्ण माहिती

Best Sectoral Funds: ऑगस्ट महिन्याच्या आलेल्या म्युच्युअल फंडाच्या आकडेवारीत इक्विटी श्रेणीतील सर्वाधिक गुंतवणूक सेक्टरल फंडांमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. AMFI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी कॅटेगरीत २०२४५ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली आहे. यामध्ये सेक्टरल फंड्समध्ये सर्वाधिक ४८०५ कोटी रुपयांचा इनफ्लो नोंदवला गेला. यानंतर स्मॉल कॅप फंडांमध्ये ४२६५ कोटी रुपयांचा इनफ्लो आला.

सरासरी २२ टक्के रिटर्न
सेक्टरल फंड कॅटेगरीच्या दीर्घकालीन कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, १० वर्षांच्या कालावधीत यानं सर्वाधिक सरासरी २२ टक्के परतावा दिलाय. या श्रेणीतील सहा योजनांनी दहा वर्षांच्या कालावधीत २० टक्क्यांपेक्षा जास्त CAGR सह परतावा दिला आहे. फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड हा यामध्ये अव्वल कामगिरी करणारा आहे. यानं सरासरी २२ टक्के परतावा दिलाय.

एकरकमी गुंतवणूकदारांना किती रिटर्न
या फंडानं १० वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना सरासरी २१.९१ टक्के परतावा दिलाय. आणि निव्वळ एकरकमी परतावा ६२६ टक्के दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं दहा वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य ७.२६ लाख रुपये झालं असतं.

एसआयपीमध्ये किती परतावा
फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडानं एसआयपीतील गुंतवणूकदारांना सरासरी १८.७५ टक्के परतावा दिलाय. निव्वळ परतावा १६८ टक्के आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं दहा वर्षांपूर्वी १० रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याचं मूल्य ३२.२० लाख रुपये झाले असते. तर त्यांची एकूण गुंतवणूक १२ लाख रुपये झाली असती.

(टीप - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. यामध्ये केवळ फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली असून हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 32 lakhs in 10 years with SIP of rs 10000 see complete details with calculations know funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.