Lokmat Money >म्युच्युअल फंड > कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स 

कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स 

Top 7 Large Cap Funds: देशात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:30 IST2025-04-08T10:22:17+5:302025-04-08T10:30:25+5:30

Top 7 Large Cap Funds: देशात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलाय.

Are you confused These 7 large cap mutual funds have made investors rich in 3 years see which funds are the best | कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स 

कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स 

Top 7 Large Cap Funds: देशात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलाय. तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्या योजनेच्या मागील परताव्याची तुलना त्याच श्रेणीतील इतर स्कीम्सशी केली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया त्या टॉप-७ म्युच्युअल फंडांबद्दल, ज्यांनी ३ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Nippon India Large Cap Fund
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडानं गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. या फंडांनं सुमारे १७.०३ टक्के प्रभावी सीएजीआर परतावा दिला आहे.

शेअर बाजाराची बंपर सुरुवात, निफ्टी ४०० अंकांनी तर, Sensex १००० अंकांनी वधारला; 'या' ५ शेअर्समध्ये जोरदार तेजी

ICICI Prudential Bluechip Fund
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडानेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून, गेल्या तीन वर्षांत सुमारे १६.३५ टक्के प्रभावी सीएजीआर परतावा दिला आहे.

ABSL Frontline Equity Fund
एबीएसएल फ्रंटलाइन इक्विटी फंडानेही गेल्या ३ वर्षांत सुमारे १२.२१ टक्के सीएजीआर परतावा दिला आहे.

Baroda BNP Paribas Large Cap Fund
बडोदा बीएनपी परिबा लार्ज कॅप फंडानं गेल्या तीन वर्षांत १३.४७ टक्के परतावा दिला आहे.

Canara Robeco Bluechip Equity Fund
कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंडानं गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना १२.१९ टक्के परतावा मिळालाय.

DSP Top 100 Equity Fund
डीएसपी टॉप १०० इक्विटी फंडानं गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे १६.३५ टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. हा फंड देशातील टॉप १०० मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

JM Large Cap Fund
जेएम लार्ज कॅप फंडानं गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना दमदार परतावा देण्याचं काम केलं आहे. यानं सुमारे १२.४६ टक्के परतावा दिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Are you confused These 7 large cap mutual funds have made investors rich in 3 years see which funds are the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.